ETV Bharat / state

आमदार गणपत गायकवाडांचे मुख्यमंत्र्यांवरील 'ते' आरोप बिनबुडाचे - मंत्री शंभूराज देसाई - मंत्री शंभूराज देसाई

Minister Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांनी महेश गायकवाड सारखे गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवलेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करताहेत, असे आरोप भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणानंतर केले होते. मंत्री शंभूराज देसाईं यांनी त्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Minister Shambhuraj Desai
मंत्री शंभूराज देसाई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 9:45 PM IST

मुंबई Minister Shambhuraj Desai : भाजपाचे आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी मागील आठवड्यात शिवसेना (शिंदे गट) कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काही गंभीर आरोप केले. गोळीबार प्रकरणी शिवसेना (शिंदे गटाच्या) मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच गणपत गायकवाडसह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आम्ही मागणी केल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी माध्यमांना सांगितलं.

गृहमंत्री दखल घेतील- देसाई: मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, समन्वय समितीचा सदस्य मीसुद्धा आहे. गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातले आमदार आहेत त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या दीड वर्षांमध्ये एकदासुद्धा कधी गणपत गायकवाड यांनी या विषयावर माझ्यासोबत किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये कधी चर्चा केली नाही. त्यामुळं वाद होता, हे कसं कळणार? याप्रकरणी आम्ही आमची मागणी आणि मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली आहेत. ते याची गंभीर दखल घेतील, अशी आम्हाला आशा आहे.

जरांगेंना आता आंदोलन करण्याची गरज नाही: मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत, असा प्रश्न मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला असता ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला आहे. सगेसोयऱ्यांबाबत अधिसूचना काढायची होती, ती काढली आहे. त्याची प्रत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारली. त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी. एकदा अध्यादेश काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करेल. जो काही निर्णय घ्यायचा तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेण्यात येईल. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असताना आणि आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना त्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेऊ नये.

सकाळचा भोंगा खरा होत नाही: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भडक वक्तव्य करत असतात. त्यांना आता शाळेतील पोरगंदेखील गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे आता माध्यमांनी त्यांना गांभीर्यानं घेऊ नये. जो त्यांचा रोज सकाळी भोंगा वाजत असतो, ते जे काही वक्तव्य करतात ती कधीच खरी ठरत नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोणी गंभीरपणे घेत नसल्याचा टोला, मंत्री शंभूराज देसाईंनी संजय राऊतांना लगावला आहे.

हेही वाचा:

  1. 'ही लोकशाहीची हत्या'; चंदीगड महापौर निवडणुकीच्या खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश संतापले!
  2. गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानं महायुतीत ठिणगी, शिवसेनेच्या सात मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांकडं 'ही' केली मागणी
  3. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय वादंग; राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.