मुंबई Mp Sanjay Raut : भाजपाकडं आता कोणतेही विषय नाहीत, म्हणून त्यांनी आता तुरुंगातील गुंडांना प्रवक्ते बनवले आहेत. तुरुंगातील गुंडांना आमच्यावर आरोप करण्यास सांगितलं जात आहे. परंतु महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता राजकारण थांबवावं. राजकारणामुळं त्यांना लोकसभेत फटका बसला आहे. सचिन वाजे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर काही गंभीर आरोप केलं. यावर खासदार संजय राऊत भाजपा आणि फडणवीस याच्यावर हल्लाबोल केलाय. राऊतांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभेला माहित पडेल: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांवर घणाघाती हल्लाबोल चढवला आहे. हे सर्व लोकं भ्रष्ट आहेत असं ठाकरेंनी म्हटलं होतं. यावरून सत्ताधाऱ्यांनी पलटवार करताना उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं वक्तव्य केलं त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. उद्धव ठाकरे यांनी कोणावर काही आरोप केलं नाहीत. फक्त महाराष्ट्रात हे भ्रष्ट लोकं आहेत असं म्हटलं आहे. परंतु कोणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेल, असा इशारा संजय राऊत आणि सत्ताधाऱ्यांना दिला.
प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये: धारावी हा मुंबईतील महत्त्वाचा भाग आहे आणि इथं सर्व जाती-धर्मातील लोकं राहतात. धारावीचा पुनर्वसन होत असताना धारावीमध्येच लोकांना ५०० फुटाची घरं मिळायला पाहिजेत, यासाठी शिवसेनेचा विरोध असण्याचं कारणच नाही. उलट धारावीतील लोकांचे धारावीमध्येच पुनर्वसन व्हावे. यासाठी शिवसेनेनं मोठा मोर्चा काढला होता, असं राऊत म्हणाले. पण या प्रकल्पाच्या माध्यमातून हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये आणि मुंबई आणि महाराष्ट्राची लूट होऊ नये, हा आमचा हेतू आहे.
मुंबईसाठी आम्ही लढू: धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून लाडक्या कॉन्ट्रॅक्टर, लाडक्या उद्योगपतींना कामं दिली जात आहे. त्यामुळे हा होणारा प्रकल्प फायद्याचा असून, मोदी-शाहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या चौकडीने मिळून उद्योगपती गौतम आदानींना मुंबईतील मोक्याचे 20 भूखंड दिले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. हे भूखंड धारावीच्या नावाखाली कोणाच्या घशात घालणार असाल तर आम्ही हे होऊ देणार नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई विकू इच्छितात. परंतु मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही. आणि मुंबई यांना विकू देणार नाही. यासाठी आम्ही लढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
देवाण-घेवाणसाठी भेट असावी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट कोणत्या कारणामुळे घेतली, असा प्रश्न संजय राऊतांना विचारला असता, त्या महाशयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार आहेत. असं म्हटलं आहे. लोकसभेत त्यांनी मोदींना बिनशर्थ पाठिंबा दिला होता. तेव्हा दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटले होते. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची देवाण-घेवाण सुरू असते. याची चर्चा करण्यास गेले असतील. असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.
हेही वाचा