ETV Bharat / state

साताऱ्यातील म्हसवडमध्ये वास्तूशांतीच्या जेवणातून दीडशे जणांना विषबाधा, रुग्णांची प्रकृती स्थिर - Maharashtra news live updates - MAHARASHTRA NEWS LIVE UPDATES

Maharashtra news live updates
Maharashtra news live updates (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 7:15 AM IST

Updated : Jun 11, 2024, 10:59 PM IST

देश, विदेशासह राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व ब्रेकिंग घडामोडी येथे तुम्हाला वाचायला मिळतील. प्रत्येक घडामोडीची अपडेट तुम्हाला या एका पेजवर वाचायला मिळते. सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या - https://www.etvbharat.com/mr/maharashtra

LIVE FEED

10:47 PM, 11 Jun 2024 (IST)

वास्तूशांतीच्या जेवणातून दीडशे जणांना विषबाधा

सातारा - म्हसवडमध्ये वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणातून विषबाधा झाली. सुमारे दीडशे जणांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने म्हसवड येथील शासकीय रुग्णालय तसेच चार खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना विषबाधा झाल्याने म्हसवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड येथे सोमवार, दि १० जून रोजी घराच्या वास्तुशांतीचे जेवण होते. जेवल्यानंतर सुमारे १०० ते १५० लोकांना विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांना त्रास झाल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली.

वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही वेळानंतर बऱ्याच लोकांना तसाच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी म्हसवडमधील चारही खाजगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती.

खासगी रूग्णालयात जागा कमी पडू लागल्याने काही रुग्णांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी दवाखान्यात देखील बाधित रुग्णांनी उपचार घेतले. याबाबत माण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.

विषबाधेच्या घटनेनंतर माणचे तहसीलदार विकास अहिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, म्हसवडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी रूग्णालयात जावून रुग्णांची चौकशी केली. तसेच घटनास्थळाची पाहणी करून अन्नाचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

10:04 PM, 11 Jun 2024 (IST)

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई - ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना राष्ट्रपतींच्या वतीने राज्य शासनामार्फत पद्म भूषण पुरस्कार प्रदान करून आज सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसेच अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी शर्मा यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्याचबरोबर शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. प्यारेलाल शर्मा यांनी यावेळी केंद्र सरकारसह राज्य शासनाचे आभार मानले.

8:43 PM, 11 Jun 2024 (IST)

पश्चिम विदर्भात मानसूनचे आगमन

नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात सक्रिय झालेला मान्सून पूर्व विदर्भाच्या वेशीवरचं थांबलाय. त्यामुळे पूर्व विदर्भात मान्सून दाखल होण्यास आणखी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागने वर्तवली आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात मात्र, मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्यापही या जिल्ह्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

7:47 PM, 11 Jun 2024 (IST)

खासदार संदिपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

भुमरे तब्बल 45 मिनिटे जरांगे पाटलांजवळ बसून

सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

काळजी घ्या, आम्हाला तुमची गरज आहे- भुमरे

खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

जवळपास ४५ मिनिटे भुमरे हे जरांगे यांच्याजवळ बसले होते.

6:32 PM, 11 Jun 2024 (IST)

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री

भाजपाचे आमदार मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. कनक वर्धन सिंग देव आणि प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील. याबाबतची घोषणा भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी केली.

5:58 PM, 11 Jun 2024 (IST)

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राज भवनात जाऊन भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते हजर होते.

5:06 PM, 11 Jun 2024 (IST)

नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई -: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरेंची मनसे चर्चेत आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील सभेत राज ठाकरे यांनी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज ठाकरेंच्या ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे या भागात सभा झाल्या. राज ठाकरेंच्या जिथे सभा झाल्या त्या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. ठाण्यात राज ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी सभा घेतली. नरेश म्हस्के भरघोस मतांनी विजयी झाले. म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता विजयानंतर नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आभार मानले.

4:32 PM, 11 Jun 2024 (IST)

भिवंडीतील अग्नितांडव ८ तासांनी आटोक्यात

ठाणे : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथील डायपर बनविणाऱ्या तळ अधिक तीन मजल्या कंपनीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अग्नितांडवावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल आठ तास लागले असून या आगीत लाखोंच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

1:47 PM, 11 Jun 2024 (IST)

मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश हे 'असंतुष्ट आत्मे'- संजय राऊतांची टीका

मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळातील खात्यांच्या वाटपानंतर एनडीएमधील नितीश कुमार आणि एन चंद्राबाबू नायडू हे 'असंतुष्ट आत्मा' आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भटकती आत्मा हा शब्द वापरला होता. त्यावरून खासदार राऊत यांनी टीका केली. खासदार राऊत म्हणाले, " केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार खाली येईपर्यंत हा भटकणारा चंचल आत्मा शांत बसणार नाही. केंद्रातील एनडीए सरकार देशाच्या हिताचे नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना वाटत असेल, तर त्यांनी हे सरकार खाली खेचले पाहिजे.

1:45 PM, 11 Jun 2024 (IST)

लालबागच्या राजाचे पाद्यपूजन होऊन राजाचे श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे पाद्यपूजन होऊन लालबागच्या राजाचे श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न झाले. याबाबतची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज ११ जून रोजी सकाळी ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या हस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत पार पडले.

1:03 PM, 11 Jun 2024 (IST)

बँकेच्या तोतया महिला अधिकाऱ्यानं ५४ कोटींची केली फसवणूक, नवी मुंबईमधील धक्कादायक प्रकार

राष्ट्रीयकृत बँकेची अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेनं मुंबई मेट्रोपोलिटियन रिजन आयर्न अँड स्टील मार्केट कमिटीची ५४ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेनं विश्वासात घेऊन कमिटीच्या निधीची गुंतवणूक करून घेतली. त्यांना अधिक परताव्याचे आमिष दाखविणारे बनावट कागदपत्रेदेखील दिली.

12:33 PM, 11 Jun 2024 (IST)

भाजपाचा मित्र पक्षांना म्हणून तर प्रॉब्लेम- सुप्रिया सुळे

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत एनडीएतील 75 खासदारांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला केवळ एक राज्यमंत्री मिळालं आहे. यावर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या, " श्रीरंग बारणे अतिशय चांगले खासदार आहेत. त्यांच्या वेदना आणि मत योग्य आहे. भाजपा मित्र पक्षांशी कसं वागतं, हे त्यांना माहित आहे."

12:29 PM, 11 Jun 2024 (IST)

चंद्राबाबू नायडू लवकरच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, एनडीएमधील आमदारांनी दिला पाठिंबा

टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू लवकरच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चंद्राबाबू यांनी म्हटले , "भाजपा, जनसेना आणि टीडीपीच्या सर्व आमदारांनी मला आंध्र प्रदेशचा एनडीए सरकारचा आगामी मुख्यमंत्री होण्यासाठी संमती दिली आहे."

12:13 PM, 11 Jun 2024 (IST)

दोन विदेशी प्रवाशांनी अंतर्वस्त्रात लपविलेले ३३ किलो सोने मुंबई विमानतळावरून जप्त

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सीमा शुल्क विभागानं दोन विदेशी विमान प्रवाशांनी 32.79 किलो सोने जप्त केले. हे सोने प्रवाशांनी त्यांच्या अंतर्वस्त्रात लपवून देशात आणले होते. जप्त केलेल्या सोन्याचे मूल्य हे 32.79 कोटी रुपये आहेत.

12:03 PM, 11 Jun 2024 (IST)

कन्नड सिनेमातील सुपरस्टार दर्शनला पोलिसांनी ताब्यात घेतलं, काय आहे आरोप?

बंगळुरू- कर्नाटक पोलिसांनी सुपरस्टार दर्शनला ताब्यात घेतले. अभिनेत्यानं त्याच्या मैत्रिणीवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. अभिनेत्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

11:51 AM, 11 Jun 2024 (IST)

नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळ आज राज्यपालांची घेणार भेट

मुंबई- काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहे. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली.

11:43 AM, 11 Jun 2024 (IST)

नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्याच्या याचिकेवर उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस

NEET-UG पेपर लीक झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं NEET-UG, 2024 परीक्षा नव्याने घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस बजावली. परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे. त्यामुळे एनटीएकडून उत्तर द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

11:03 AM, 11 Jun 2024 (IST)

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस, प्रकृती खालावल्यानं तपासणी

मराठा आरक्षणाचे आंदोलक, नेते मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला आज 4 दिवस आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. मराठा आरक्षणाचा अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण उपोषणाला सुरुवात केले. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा त्यांनी इशारा दिला आहे.

9:54 AM, 11 Jun 2024 (IST)

ट्रकनं धडक दिल्यानं फूड डिलिव्हरी फर्ममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

ठाणे- ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्ममध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास खारघर परिसरात हा अपघात झाला. बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

9:11 AM, 11 Jun 2024 (IST)

विशेषतः लोकशाहीत सरकारसाठी सलग तीन वेळा निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट-डॉ. एस. जयशंकर

नवी दिल्ली- एनडीए मंत्रिमंडळात आज विविध मंत्री त्यांच्या मंत्रालयात पदभार स्वीकारत आहे. कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यमंत्री, पर्यावरण, वन आणि हवामान बदल म्हणून पदभार स्वीकारला. भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल म्हणून पदभार स्वीकारला. अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. डॉ. एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. परराष्ट्रमंत्री म्हणून पुन्हा पदभार स्वीकारताना डॉ. एस. जयशंकर म्हणाले, " कोणत्याही देशात आणि विशेषतः लोकशाहीत सरकारसाठी सलग तीन वेळा निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. भारतात खूप राजकीय स्थैर्य असल्याचं जगाला माहित आहे. प्रत्येक देशासोबतचे संबंध वेगवेगळे आहेत. तसेच समस्याही वेगळ्या आहेत. चीनच्या बाबतीत सीमेवरील प्रश्नांवर तोडगा काढायचा आहे. तर पाकिस्तानसोबत अनेक वर्षे सीमेपलीकडून असलेल्या जुन्या दहशतवादाच्या समस्येवर तोडगा काढायचा आहे."

9:00 AM, 11 Jun 2024 (IST)

विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखा- एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या आमदारांची शिवसेना भवन येथे सोमवारी दुपारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ यांनी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीला अजून चार ते पाच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण आतापासून कामाला लागा. मतदारसंघांत पक्षबांधणी मजबूत करा. जे नाराज असतील त्यांची नाराजी दूर करा. यासाठी नियोजन करा. आपले आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील, याची रणनीती आखा, अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिल्याची माहिती कळते.

7:31 AM, 11 Jun 2024 (IST)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी

येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहील, असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला. शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पालघर , ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

7:23 AM, 11 Jun 2024 (IST)

भिवंडी तालुक्यातील सरवली येथे डायपर बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग

ठाणे- भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथे डायपर बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागली. सदाशिव हायजिन प्रा. लि असे भीषण आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. भिवंडी, कल्याण आणि ठाणे येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे

Last Updated : Jun 11, 2024, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.