मुंबई Vidhanparishad Election: विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी सोहळा झाला. विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना शपथ दिली. शपथविधी घेतल्यांतर भावना गवळी यांनी "जय महाराष्ट्र, जय एकनाथ" असं म्हटलं. तर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना नमन केलं.
आमदाकीची शपथ घेणारे सदस्य
१) पंकजा मुंडे (भाजपा)
२) डॉक्टर परिणय फुके(भाजपा)
३) अमित बोरखे (भाजपा)
४) योगेश टिळेकर(भाजप)
५) सदाभाऊ खोत (भाजप समर्थक)
६) भावना गवळी(शिंदे गट)
७) कृपाल तूमाने(शिंदे गट)
८) राजेश विटेकर (अजित पवार गट)
९) शिवाजीराव गर्जे ( अजित पवार गट)
१०) मिलिंद नार्वेकर (उबाठा)
११) प्रज्ञा सातव (काँगेस)
भावना गवळी म्हणाल्या, जय एकनाथ: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या माजी खासदार भावना गवळी यांचे तिकीटं कापण्यात आलं होतं. त्यानंतर नाराज भावना गवळी यांचं पुनर्वसन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन करण्यात आलं. या कारणाने आज भावना गवळी यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तर उबाठा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना नमन केले. शपथ घेतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाचे आभार मानले.
चुरशीची ठरली होती निवडणूक: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान झाले होते. या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. यामध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात होते. यात राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. गुप्त पद्धतीने या निवडणुकीत मतदान झाले असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला होता.
हेही वाचा