ETV Bharat / state

पंतप्रधान आणि गृहमंत्री जम्मू-काश्मीरला भेट देणार नाहीत का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Maharashtra live update news - MAHARASHTRA LIVE UPDATE NEWS

maharashtra live update news
maharashtra live update news (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 7:22 AM IST

Updated : Jun 12, 2024, 2:00 PM IST

नागपूर- राज्य सरकारकडून आयटी क्षेत्रात 95,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकारनं देशाची 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून ओळख निर्माण केलेल्या बंगळुरूमध्ये मंगळवारी 'रोड शो' केला. या रोड शोमध्ये आयबीएम, अॅडोब, विप्रो, जेपी मॉर्गन चेस, लिंक्डइनसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) सह मुख्य कार्यकारी अनिल भंडारी म्हणाले की, "भारतातील सर्वात औद्योगिकदृष्ट्या विकसित राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. राज्यानं गेल्या वर्षी स्वीकारलेल्या आयटी धोरणाचा भाग म्हणून या क्षेत्रात 95,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केलं आहे.." महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले की, "इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि ऑगमेंट आणि व्हर्च्युअल रिॲलिटी यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

LIVE FEED

1:57 PM, 12 Jun 2024 (IST)

'अबकी बार' वाले कोठे गेले आहेत? उद्धव ठाकरेंचा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून सवाल

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, " ही जबाबदारी कोणाची आहे? 'अबकी बार' वाले कोठे गेले आहेत? पंतप्रधान आणि गृहमंत्री जम्मू-काश्मीरला भेट देणार नाहीत का? ही पंतप्रधान मोदींची जबाबदारी आहे. जर त्यांना या गोष्टी हाताळू शकता येत नसतील तर त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्याचा अधिकार नाही."

12:02 PM, 12 Jun 2024 (IST)

माळशेज घाटात कोसळली दर, ऑटोरिक्षावर मोठा दगड पडल्यानं दोन जण ठार

ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाट येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ही दरड ऑटोरिक्षावर कोसळल्यानं एक पुरुष आणि अल्पवयीन मुलगा ठार झाला. तर एक महिला जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. टोकावडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर चकोर यांनी सांगितले की, "एका कुटुंबातील पाच सदस्य मुंबईच्या शेजारील मुलुंड येथून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला ऑटो-रिक्षातून प्रवास करत होते. त्यावेळी ही घटना घडली."

11:56 AM, 12 Jun 2024 (IST)

चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ, पंतप्रधानांनी केलं अभिनंदन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली.

11:11 AM, 12 Jun 2024 (IST)

अमित शाह यांच्यामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका-संजय राऊत

जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं हल्ले होत आहे. अमित शाह यांच्यामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा मागयला हवा. गृहमंत्री पदाचा वापर विरोधकांचा काटा काढण्यासाठी होत आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

10:41 AM, 12 Jun 2024 (IST)

डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव, एमआयडीसी फेस टू मधील कंपनीत भीषण आग

डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव निर्माण झाले. एमआयडीसी फेस टू मधील Indo Amines कंपनीला भीषण आग लागली. आगीच्या घटनांमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.

धुराचे लोट उंचच्या उंच हवेत पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अद्याप, आगीचे कारण अस्पष्ट आहे.

9:56 AM, 12 Jun 2024 (IST)

भारत वेगाने जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज होईल-नितीन गडकरी

नवी दिल्ली- भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एनडीए सरकारमध्ये पुन्हा एकदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. गडकरी म्हणाले, " मोदी 3.0 मध्ये मला ही भूमिका पुन्हा सोपवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा मनःपूर्वक आभार आहे. "नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत वेगाने जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज होईल," असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

9:10 AM, 12 Jun 2024 (IST)

डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा हल्ला, सैन्यदलाच्या पाच जवानांसह पोलीस अधिकारी जखमी

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्यदलाचे पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) असे सहा जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आज पहाटे 1:45 वाजता डोडा येथील चत्तरगल्ला भागात सैन्यदल आणि स्थानिक पोलिसांच्या चौकीवर हल्ला केला. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांना पकडण्याकरिता शोधमोहिम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना भदेरवाह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

8:56 AM, 12 Jun 2024 (IST)

राज्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक, कोणत्या विषयावर होणार चर्चा?

मुंबई- लोकसभा निवडणुकीतील असमानधकारक कामगिरीनंतर भाजपाकडून संघटन बळकटीवरणार जोर देण्यात येत आहे. भाजपाकडून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची 14 जूनला बैठक घेण्यात येणार असल्याचं सूत्रानं सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून नियोजन आणि तयारी कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला भाजपाचे सर्व जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

8:18 AM, 12 Jun 2024 (IST)

सरकारी काम असल्याचे भासवित फुटपाथ खोदून तांब्याच्या तारांची चोरी, सहा जणांना अटक

मुंबई-पावसाळ्यात खड्डे खोदून पायाभूत सुविधांची कामे केले जात असल्यानं अनेकदा मुंबईकरांच्या त्रासात भर पडते. मात्र, दादरमध्ये चक्क रस्ते खोदून युटिलिटी केबल्समधून तांब्यांच्या तारांची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख ते ७ लाख किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत. मध्य मुंबईतील दादर-माटुंगा रोडलगतचा फूटपाथ हा चोरट्यांनी खोदल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

7:34 AM, 12 Jun 2024 (IST)

एन. चंद्राबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, रजनीकांतसह दिग्गज नेते लावणार हजेरी

टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू हे आज आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्ष, भाजपा आणि जनसेना यांच्या युतीनं प्रचंड बहुमत मिळविलं आहे. चंद्राबाबू यांनी मंगळवारी राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तेलगू देसम पार्टी-भारतीय जनता पार्टी-जनसेना युतीचे नेतृत्व करून आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला. मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर यांची राजभवनात भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याकरिता सुपरस्टार रजनीकांत हे मंगळवारी (11 जून) संध्याकाळी विजयवाडा येथे पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील चंद्राबाबू यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

7:22 AM, 12 Jun 2024 (IST)

खून प्रकरणात राज्यातील दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक

नागपूर- महाराष्ट्र सरकारमधील सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) संचालक प्रशांत पार्लेवार याला मंगळवारी रात्री नागपूर गुन्हे शाखेनं अटक केली. उद्योगपती पुरोषत्तम पुट्टेवार यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली, यामध्ये त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीचा स्वीय सहाय्यक आणि पुट्टेवार यांची सून अर्चना मनीष पुत्तेवार (53) हिलाही ताब्यात घेतले. आरोपी महिला ही गडचिरोलीतील नगररचना विभागात सहाय्यक संचालक म्हणून काम करते. पुरोषत्तम पुट्टेवार यांच्या हत्याप्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या प्रकरणात दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर राज्याच्या अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली.

Last Updated : Jun 12, 2024, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.