मुंबई/लातूर : वक्फ बोर्ड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी यांच्यातला जमिनींचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय. लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवल्या आहेत. जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे. वक्फ बोर्ड आपल्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अन्याय होऊ देणार नाही : विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत भाष्य केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, "हे सामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळं या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही."
#WATCH | Mumbai: On Latur farmers getting notices from Maharashtra Waqf Board over land, Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, " ...this government belongs to the common people. we won't let injustice happen to anyone..." pic.twitter.com/Xqz4A5TpzN
— ANI (@ANI) December 8, 2024
कारवाई करू शकत नाही : "वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस प्रकरणाबाबत आपल्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. नोटीस पाठवण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांची जमीन असेल व ते तिथे शेती करत असतील. सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर वक्फ बोर्ड अशी कार्यवाही करु शकत नाही," असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
#WATCH | Mumbai: On Latur farmers getting notices from Maharashtra Waqf Board over land, Maharashtra BJP chief Chandrashekhar Bawankule says, " waqf board has done mischief. a lot of properties are for hindu deities, for hindu trusts, for farmers, but they have forcibly encroached… pic.twitter.com/nwA7bFpFwd
— ANI (@ANI) December 8, 2024
चौकशी करण्याची विनंती : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणावर म्हणाले, "वक्फ बोर्डानं अनेकांची मालमत्ता, हिंदू देवी-देवतांचे मंदिर, हिंदू ट्रस्ट आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर बळजबरीनं अतिक्रमण करुन या जागा आपल्या नावावर करुन घेतल्या. या सर्व मालमत्तेचं डिजिटायझेशन झालं पाहिजे. मी केंद्र आणि राज्य सरकारला या प्रकरणाची काटेकोरपणे चौकशी करण्याची विनंती करतो."
सरकारनं न्याय द्यावा : "या जमिनी पिढ्यानपिढ्या आमच्याकडं आहेत. ही वक्फची मालमत्ता नाही. महाराष्ट्र सरकारनं आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची इच्छा आहे. या प्रकणावर न्यायालयात दोनदा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे," असं तुकाराम कानवटे या शेतकऱ्यानं 'पीटीआय'शी बोलताना सांगितलं.
नेमकं प्रकरण काय? : लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे, असा दावा तेथील शेतकऱयांनी केला. या जमिनीच्या वादात सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेलं आहे. या प्रकरणामुळं तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
हेही वाचा