सातारा POLICE OFFICER TRANSFER : राज्याच्या गृह विभागानं पोलीस अधीक्षक तथा उपायुक्त आणि अप्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गृह विभागानं सोमवारी सायंकाळी राज्यातील १७ आयपीएस आणि ११ अप्पर पोलीस अधिकारी अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. परंतु साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सुधाकर पठारे यांच्या बदलीवर स्टे आल्यानं इतर २६ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश कायम आहेत.
अफजल खान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण हटवलं : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कार्यकाळात हटवण्यात आलं. अत्यंत गोपनीय पद्धतीनं पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तसंच यंदाच्या अतिवृष्टीच्या काळात समीर शेख यांनी जीवितहानी रोखण्यासाठी पर्यटनस्थळं बंद करण्याचे दोनवेळा आदेश काढले. त्यामुळेही समीर शेख हे चर्चेत आले.
पुसेसावळी दंगलीचा डाग : पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कार्यकाळात खटाव तालुक्यातील पुसेसावळीत दंगल झाली. प्रार्थनास्थळावरील हल्ल्यात अल्पसंख्यांक समाजातील तरुणाचा बळी गेला. जाळपोळ, मोडतोड झाली. आठ दिवस संचारबंदी होती. तसंच काही दिवस इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली. मायणी मेडिकल कॉलेजचं कोविड काळातील प्रकरण, वाई तालुक्यातील पाचवड कॉलेजमधील प्राध्यापिकेविरोधातील कारवाईत उच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे ओढले. या घटनांनी समीर शेख यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.
राज्यातील बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं, कंसात नियुक्तीचे ठिकाण : अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस अधीक्षक, हिंगोली), सुधाकर बी. पठारे ( बदलीला स्थगिती ), अनुराग जैन (पोलीस अधीक्षक, वर्धा), विश्व पानसरे ( पोलीस अधीक्षक, बुलढाणा ), शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे), संजय वाय. जाधव ( पोलीस अधीक्षक, धाराशीव ), कुमार चिता (पोलीस अधीक्षक, यवतमाळ), आँचल दलाल (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे), नंदकुमार ठाकूर (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड), नीलेश तांबे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), पवन बनसोड (पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती), नुरुल हसन (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११, नवी मुंबई), समीर अस्लम शेख ( बदलीला स्थगिती ), अमोल तांबे (पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे), मनिष कलवानिया (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), अपर्णा गिते (कार्यकारी संचालक, सुरक्षा आणि अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई).
हेही वाचा