ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी सरकारचं षडयंत्र, अनिल देशमुखांच्या दाव्यानं खळबळ - Pune hit and run case - PUNE HIT AND RUN CASE

Pune Hit and Run Case : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. आरोपींना वाचवण्यासाठी दोन्ही मृतकांच्या अहवालात छेडछाड करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Former Home Minister Anil Deshmukh
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 4:12 PM IST

नागपूर Pune Hit and Run Case : पुणे हिट ॲंड रन प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात राज्य सरकराचा हात असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एवढंच नाही, तर मृतांचा व्हिसेरा अहवालातही ( Viscera Report ) छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचं देशमुख म्हणाले. मृताचा व्हिसेरा अहवाल तयार करण्यात आला असून तो सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृत व्यक्ती दारु पिऊन गाडी चालवत होते, असं न्यायालयातं दाखवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

मृतकांच्या व्हीसेराशी छेडछाड : दोन्ही मृतकांच्या व्हीसेरामध्ये अल्कहोलचे अंश टाकण्यात आले, अशी माझ्याकडं पक्की माहिती आहे. आधी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र, तो प्रयत्न फसल्यानंतर आता अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी दुसरा प्रयत्न केला जात आहे. असं झाल्यास आरोपीची निर्दोष मुक्तता होईल. यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचं ते म्हणाले आहेत.

कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न : उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला 31जागेवर विजय मिळाला. त्याच प्रमाणे विधानसभेत देखील आमचाच विजय होणार असल्याचा दावा देखमुखांनी केलाय.

फोडाफोडीच्या राजकारणामुळं लोक त्रस्त : राज्यात महाविकास आघाडीचं येणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळं राज्याचे लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणूकीवर होईल. आमच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुठलाही वाद नाही.

महाविकास आघाडीत लहान-मोठं कुणी नाही : शरद पवार यांचा पक्ष फोडण्यात आला. त्याचा राग जनतेच्या मनात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पैकी कुणीही छोटा-मोठा भाऊ नाही. आमच्यामधील कोणत्याही पक्षानं, असं वक्तव्य करु नये, असं ते म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. आरएसएस सुनेत्रा पवारांना विरोध करणार का? मोहन भागवतांना संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut
  2. कृतज्ञता दौरा : नूतन खासदार प्रणिती शिंदेंचा दुधाच्या छोट्या गाडीतून प्रवास - Praniti Shinde Travel In Milk Tempo
  3. नागपुरातील चामुंडा बारुड कंपनीत स्फोट; सहा कामगारांचा मृत्यू - Maharashtra live updates news

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.