ETV Bharat / state

विनोद तावडे यांच्या मध्यस्थीने अखेर गोपाळ शेट्टी यांचा अर्ज मागे; 'संजय'चा मार्ग मोकळा - VINOD TAWADE

गोपाळ शेट्टी यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीतून माघार घेणार नाही, असं ठामपणे सांगणारे गोपाळ शेट्टी अखेर पक्षश्रेष्ठींच्या विनंतीपुढे झुकलेत.

Gopal Shetty's candidature withdrawn
गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी मागे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 1:56 PM IST

मुंबई - बोरिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपामधील बंडखोरीचा पेच अखेर शेवटच्या दिवशी सुटलाय. माजी खासदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीतून माघार घेणार नाही, असं ठामपणे सांगणारे गोपाळ शेट्टी अखेर पक्षश्रेष्ठींच्या विनंती पुढे झुकलेत. या कारणाने आता या मतदारसंघातून भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांच्या विजयाचा मार्ग सोपा झालाय.

भाजपा पक्षश्रेष्ठींची मध्यस्थी: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सतत दोन वेळचे खासदार राहिलेले भाजपा नेते, गोपाळ शेट्टी यांचा मागील लोकसभा निवडणुकीत पत्ता कट करण्यात आलाय. त्यादरम्यानच नाराज गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करताना त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिलं जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा होती. परंतु विधानसभेसाठी भाजपाने उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने गोपाळ शेट्टी फार नाराज झालेत. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला. गोपाळ शेट्टी यांचा बोरिवली मतदारसंघावर असलेला प्रभाव बघता भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांच्यासाठी ही लढाई चुरशीची झाली असती. या कारणाने गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. हे प्रयत्न पुढे अपुरे पडत असताना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी यात दखल घेतली. अखेर आज भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांची मनधरणी केल्यानंतर शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयावर बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले की, होय मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. मला इतर पक्षातून उमेदवारी देण्यासाठीसुद्धा ऑफर्स आल्या होत्या. परंतु मी आमदार बनण्यासाठी लढत नसून माझी लढाई ही विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. या दिवसात अनेक पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले. त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मागील ३३ वर्ष मी पक्षाशी एकनिष्ठ काम करत आहे. या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार सतत आणला जात असल्याने त्यावर मी नाराजी व्यक्त केली होती. अखेर पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो. माझ्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी ठरलोय, असंही गोपाळ शेट्टी म्हणालेत.

भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टीजी यांनी पक्षहिताचा निर्णय घेत एक सच्चा कार्यकर्ता कसा असतो, याचे उत्तम उदाहरण सर्वांपुढे ठेवलंय. पक्षहित कायम त्यांनी सर्वोच्च ठेवले आणि त्याच्याशी कधीच तडजोड केली नाही. हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

-देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते

हेही वाचा-

  1. महाविकास आघाडी सरकार हप्ते वसुली सरकार - मुख्यमंत्र्यांची टीका, शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटला
  2. बंडखोरीमुळं भाजपाची वाढली डोकेदुखी; अकोला पश्चिममध्ये बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.