ETV Bharat / state

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार : शपथविधी सोहळा, 39 आमदारानी घेतली मंत्रिपदाची शपथ - MAHARASHTRA CABINET EXPANSION

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून शपथविधी सोहळा नागपुरात पार पडला आहे. आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

Maharashtra Cabinet Expansion
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 24 minutes ago

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कर्मभूमीत दाखल झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "आज शपथ घेणारे मंत्री अडीच वर्ष पदावर राहतील," असं त्यांनी स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "ही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही, आमचे पाय जमिनीवर राहतील," असं स्पष्ट केलं.

भावी मंत्री अडकले वाहतूक कोंडीत, पायी निघाले राजभवनाकडं : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार होत असून हा सोहळा नागपुरातील राजभवनात आयोजित करण्यात आला. मात्र भावी मंत्र्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. राजभवन बाहेर प्रचंड ट्राफिक जाम झाली. त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक संभाव्य मंत्री पायी राजभवनाच्या दिशेनं निघाले. राजभवनात जाण्यासाठी निघालेले आमदार वाहतूक कोंडीमुळे बाहेर अडकले होते. अनेक संभाव्य मंत्री गाडी सोडून राजभवनात पायी निघाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शपथविधी सोहळा सुरू : नागपुरात आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या शपथविधी सोहळ्यात तब्बल 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, गणेश नाईक, संजय सावकारे, अशोक उईके, आशिष शेलार, आकाश फुंडकर आणि जयकुमार गोरे आदी आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेचे संजय राठोड, प्रकाश अबिटकर, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि दत्ता भरणे या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.

अडीच वर्षच मिळणार मंत्रिपदाची संधी : आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षच मंत्रीपदावर काम करता येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. अजित पवार म्हणाले, की आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्ष काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला आमचं सरकार योग्य प्रमाणात निधी देण्याचा प्रयत्न करेल. यातून प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नही करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. महायुतीत गेल्या सरकारमधील 'या' मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच; मंत्रिमंडळातून डच्चू?
  2. विरोधकांचा संविधानावर विश्वास नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  3. फोन आला का? मंत्रिपद शपथविधीपूर्वी महायुतीच्या नेत्यांची उडतेय धांदल

Last Updated : 24 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.