सातारा - लोकसभा सभापतिपदाचा चेहरा निश्चित करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली तर त्याला पाठिंबा दिला जाईल. आपल्याकडे लोकशाहीत ती परंपरा चालत आली आहे. मात्र, रेटून काही केलं तर आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - Maharashtra Breaking News Live
Published : Jun 17, 2024, 7:46 AM IST
|Updated : Jun 17, 2024, 9:09 PM IST
Maharashtra Breaking News : 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजसाठी या पेजवर अपडेट पाहत राहा. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या /mr/maharashtra
LIVE FEED
इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
दक्षिण मुंबईतील लॉनमधून निघालेल्या २० वर्षीय तरुणाचा मसिना रुग्णालयात झाला मृत्यू
मुंबई : दक्षिण मुंबईतील माझगाव येथे बेव्युव्ह लॉन या ठिकाणी हॉर ऑन टूर इंडिया या म्युझिक शोमध्ये मध्यरात्री एक दीडच्या सुमारास वीस वर्षीय तरुणाची तब्येत बिघडल्याने त्याला त्याच्या मित्रांनी भायखळ्यातील मसिना रुग्णालयात दाखल केलं. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला उपचारादरम्यान मृत घोषित केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे.
१९ जूनपासून पोलीस भरती प्रक्रियेला होणार सुरुवात
अपर पोलीस महानिरीक्षक राज कुमार व्हटकर यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्र पोलिस दलात विविध १७ हजार पदे रिक्त होती यासाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेले आहेत
कारागृह भरतीही आम्ही करत असतो. १ हजार ८०० पदासाठी ३ लाख ७२ हजारहून अधिक अर्ज आलेले आहे.
लोकसभा निवडणूकीमुळे ही भरती करण शक्य नव्हतं
मात्र १९ जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे
लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत
जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती. दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही
मात्र दोन वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो.
विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही त्यांना त्यात सुटं देण्यात आलेली नाही.
आरती ड्रग्स कंपनीत भीषण आग
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन -१९८ मधील आरती ड्रग्स या कंपनीत भीषण आग लागली असून आगीचे मोठे लोट निघत आहेत
घटनास्थळी अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतपत्रिकेवर मतदानाची प्रक्रिया करू-नाना पटोले
काँग्रेसनं पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " केंद्र सरकार मतदानासाठी बॅलेट पेपर का वापरत नाही? हा प्रश्न काँग्रेसकडून वारंवार विचारला जात आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतपत्रिकेवर मतदानाची प्रक्रिया करू, तशी आमची इच्छा आहे."
मध्य प्रदेशात आता मॉल्ससह बाजारपेठा २४ तास खुल्या राहणार
भोपाळ- मध्य प्रदेश सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात बाजारपेठा २४ तास सुरू राहणार आहेत. त्यामुळे व्यवसायासोबतच नोकऱ्यांमध्ये वाढ होण्यास फायदा होईल, असा सरकारला विश्वास आहे. नव्या निर्णयानुसार मध्यप्रदेश रेस्टॉरंट्स, मॉल्स, हॉटेल्स, बिझनेस सेंटर्स आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यालये रात्रंदिवस कार्यरत राहतील.
नागपूर शहरात पुन्हा 'हिट अँड रन', कारनं चिरडल्यानं दोन जणांचा मृत्यू, काही जण गंभीर
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात "हिट अँड रन"च्या घटनांमध्ये मोठी झाली आहे. रात्री एका कारचालकानं फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली असून या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. रात्री उशिरा वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिघोरी चौकाजवळ ही घटना घडली आहे. दिवसभर शहरातील विविध भागात फुटपाथवर खेळणी विक्रीचा व्यवसाय केल्यानंतर रोजच्या दिनक्रमानुसार काही लोक फुटपाथवर झोपले होते. यावेळी उमरेडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ही कार थेट फुटपाथवर चढली. त्यामुळे कार झोपलेल्या लोकांवर चढली, यात दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
पोलीस कोठडीत चोराचा आत्महत्येचा प्रयत्न
आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. चोरीच्या गुन्ह्यात ४० वर्षीय गांधीराज व्यंकट स्वामी या आरोपीला अटक करण्यात आली होती. आज सकाळी ७ च्या सुमारास आरोपी स्वामी यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.
कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची धडक, घटनास्थळी मदतकार्य सुरू
दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीने धडक दिली. बचाव कार्यासाठी आपत्ती पथकांनी घटनास्थळी धाव घेतल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली.
छत्तीसगड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, ४ नक्षलवादी ठार
छत्तीसगड जिल्ह्यातील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील अमरूद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले.
रविंद्र वायकर यांच्यासारखेच ४५ निकाल भाजपानं देशात लावलेत-संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुंबई उत्तर पश्चिममधील निकालाबाबत संशय व्यक्त केला. खासदार राऊत म्हणाले, " हा एक आदर्श घोटाळा आहे. वंदना सुर्यवंशी यांचा मोबाईल जप्त करा. त्या निवडणूक अधिकाऱ्याचा इतिहास तपासला पाहिजे. अमोल कीर्तिकर यांना दोनवेळा विजयी जाहीर करण्यात आलं होतं. मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल अत्यंत रहस्यम आणि संशयास्पद आहे. चोरून विजय मिळविणाऱ्यांना शपथ घेऊ देऊ नका. रविंद्र वायकर यांच्यासारखेच ४५ निकाल भाजपानं देशात लावले आहेत."
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार
विधानसभा विसर्जित होण्याआधी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. विधान परिषदेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची तयारी.
अदानी समूह भूतानमध्ये 570 मेगावॅटचा ग्रीन हायड्रो प्लांटची करणार उभारणी
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी भूतानमध्ये 570 मेगावॅटचा ग्रीन हायड्रो प्लांट तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्याची रविवारी घोषणा केली. शेजारील देशात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अदानी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांची भूतानमधील थिम्पू येथे भेट घेतली. या भेटीची अदानी यांनी सोशल मीडियात पोस्ट केली.
ईव्हीएमला देव किंवा राक्षस ठरवू नये-मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली- भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ईव्हीएममधील कथित घोळाबाबत प्रतिक्रिया दिली. नक्वी म्हणाले, "आपण ईव्हीएमला देव किंवा राक्षस ठरवू नये. ईव्हीएम अनेक 'अग्निपरीक्षा'मधून पोहोचले आहे. त्यात ईव्हीएम यशस्वी झाले आहे. पूर्वी लोक त्यावर राष्ट्रीय स्तरावर हल्ला करायचे. आता काही आंतरराष्ट्रीय मारेकरी ईव्हीएमविरोधात उभे ठाकले आहेत."
देशभरातील मुस्लीम बांधवांमध्ये बकरी ईदनिमित्त उत्साह, मशिदीत केले नमाज पठण
नवी दिल्ली- देशभरात मुस्लीम बांधवांकडून बकरी ईद साजरा केला जात आहे. कोईम्बतूर येथील इस्लामिया मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. अजमेरमधील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गा येथे नमाज पठण करण्यात आले. नवी दिल्लीत फतेहपुरी मशिद, भोपाळळमधील इदगाह मशिद, श्रीनगरच्या सोनवार येथील सरकारी मुलींच्या उच्च माध्यमिक विद्यालयात, गोरखपूरमधील मुबारक खान शहीद मझार, माहीमच्या मखदूम अली माहिमी मशिदीत आणि नवी दिल्लीत जामा मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.