ETV Bharat / state

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर; कलेची अविरत सेवा सुरुच राहणार, 'ईटीव्ही'ला Exclusive प्रतिक्रिया

Ashok Saraf Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय. अशोक सराफ यांनी पाच दशकांहून अधिक काळ आपल्या कसदार अभिनयानं नाट्य आणि चित्रपटरसिकांच्या ह्रदयात स्थान मिळवलं.

Ashok Saraf
अशोक सराफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 5:38 PM IST

Updated : Jan 30, 2024, 6:13 PM IST

मुंबई Ashok Saraf Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जाणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची निवड झाली आहे. सन २०२३ चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार (Maharashtra Bhushan Award 2023) जाहीर झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. अशोक सराफ यांनी पाच दशकांहून अधिक काळ आपल्या कसदार अभिनयानं नाट्य आणि चित्रपटरसिकांच्या ह्रदयात स्थान मिळवलं. मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपट, मालिका सर्वत्र अशोक सराफ यांचा थक्क करणारा वावर राहिला.

अशोक सराफ यांचा प्रवास : चेहऱ्यावर भाबडे भाव राखणारा विनोदी अभिनेता, कावेबाज खलनायक किंवा परिपक्व चरित्र अभिनेता, व्यक्तिरेखा कोणतीही असो, त्यात अशोक सराफ जणू परकायाप्रवेश केल्याप्रमाणे ती व्यक्तिरेखा जगतात. दिवंगत अशोक कुमार उर्फ 'दादामुनी' हे अशोक सराफ यांचे आवडते कलावंत. 'दादामुनीं'कडून कोणत्याही व्यक्तिरेखेत समरस होऊन जाण्याची कला अशोक सराफ यांना साधली. त्यांच्या बहुआयामी अभिनयप्रतिभेची दखल महाराष्ट्र सरकारनं त्यांना 'महाराष्ट्र भूषण' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवत घेतली आहे.

'ईटीव्ही भारत'ला Exclusive प्रतिक्रिया : 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला याचा खूप आनंद झालाय. माझ्यासाठी ही फारच आनंदाची गोष्ट आहे, अशी Exclusive प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. अशोक सराफ यांचं पद्म पुरस्कारासाठी नाव चर्चेत होतं. यावर विचारलं असता, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार पद्म पुरस्कारापेक्षा कमी मानाचा नाही. त्यामुळं हा पुरस्कार मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अभिनयाची ही वाटचाल अविरत सुरूच राहणार आहे. पुढच्या महिन्यात दोन चित्रपटांचं शुटिंग सुरू होत आहे. त्यामुळं मी स्टेजवर कायमच दिसेन, असंही अशोक सराफ म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदनही केलंय. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन करताना दिली.

हेही वाचा -

  1. कसदार हरहुन्नरी अभिनेता अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव, अवघ्या कलाक्षेत्राचा सन्मान
  2. Ashok Saraf : अशोक सराफ यांचा 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारा'ने गौरव

Last Updated : Jan 30, 2024, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.