ETV Bharat / state

नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई, दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक - महाराष्ट्र एटीएस

Nashik ATS : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) बुधवारी नाशिकमध्ये मोठी कारवाई केली. एटीएसनं टेरर फंडिंग प्रकरणी एकाला अटक केली आहे.

ATS
ATS
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 8:52 PM IST

नाशिक Nashik ATS : नाशिकमध्ये महाराष्ट्र एटीएसनं (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं (ATS) भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक केली. हुजेफ अब्दुल अजीजशेख असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपीला 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप : दहशतवाद विरोधी पथकानं नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून हुजेफ अब्दुल अजीज शेख याला अटक केली. या व्यक्तीवर आयएसआयएस (ISIS) आणि इंडियन मुजाहिदीन (IM) या दहशतवादी संघटनांचं फंडींग आणि त्यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

आरोपीच्या घराची झडती घेतली : एटीएसच्या पथकानं आरोपीच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान एटीएसनं एक लॅपटॉप, सात मोबाईल आणि एक पेन ड्राइव्ह हस्तगत केला. आरोपी हुजेफ शेख सीरियातील आयसिसशी संबंधित एका महिलेला पैसे पाठवत असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे.

31 जानेवारीपर्यंत कोठडी : एटीएसच्या सूत्रांनुसार, हा व्यक्ती उच्च शिक्षित असून, तो अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार आहे. एटीएसनं त्याच्या साथीदारांच्या तपासासाठी बिहार, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पथकं रवाना केली आहेत. अटक करण्यात आल्यानंतर आरोपीला विशेष न्यायालयाकडून 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

बोरिवलीत कारवाई केली होती : यापूर्वी एटीएसनं 7 जानेवारीला बोरिवलीत मोठी कारवाई करत 6 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दारूगोळाआणि शस्त्रास्त्रंही जप्त करण्यात आला होता. बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून एटीएसनं ही कारवाई केली होती.

हे वाचलंत का :

  1. मुंबई एटीएसची मोठी कारवाई, 3 बंदुका अन् 36 जिवंत काडतुसे जप्त; 6 अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.