ETV Bharat / state

सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "लढून जिंकण्यात जास्त..." - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024

राज्यभरात मनसेचे अनेक उमेदवार विजयी होतील. तसंच माहीममध्ये अमित ठाकरे यांचा विजय निश्चित असल्याचं अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, सदा सरवणकर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 7:11 PM IST

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.राज्याचं लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे शिवसेनेकडून सदा सरवणकर यांनीही आज अर्ज दाखल केला. पण तो अर्ज शिवसेनेकडून आहे की अपक्ष याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम : सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घ्यावी, असं शिवसेना पक्षातून अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. पक्षाकडून त्यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावर अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. "आम्ही तर काही विनंती केली नव्हती. मी तर कालच म्हटलं होतं की, निवडणूक लढून जिंकण्यात जास्त मजा असते," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

अमित ठाकरेंचा विजय निश्चित : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून मनसेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. "निवडणुकीत सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं असून राज्यात विविध ठिकाणी मूलभूत सुविधाही नीट पुरवल्या जात नाहीत. याकरता मनसेकडून युवा नेतृत्वाला संधी देण्यात आलीय. गणेश भोकरे हे तरुण आणि विकासाचा चेहरा असलेले उमेदवार आहेत. कसबा मतदारसंघांतील जनता त्याच त्याच लोकांना कंटाळलीय. येथील जनता नवीन आणि तरुण उमेदवार गणेश भोकरे यांना विजयी करेल, असा विश्वास आहे. त्याचबरोबर राज्यभरात मनसेचे अनेक उमेदवार विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. तसंच माहीममध्ये अमित ठाकरे यांचा विजय निश्चित असून लढून जिंकण्यात जास्त मजा आहे, या विचारानं आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत," असं यावेळी ठाकरे म्हणाल्या.

हेही वाचा

  1. बडनेरात भाजपा 'फिफ्टी-फिफ्टी'; रवी राणा महायुतीचे अधिकृत उमेदवार, तुषार भारतीयांची बंडखोरी
  2. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 'या' दिग्गजांनी दाखल केले अर्ज, राजकीय पक्षांपुढे बंडखोरांना थोपवण्याचं मोठं आव्हान
  3. मुंबईत भाजपाला धक्का, माजी आमदारानं मनसेत प्रवेश करत मिळवली उमेदवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.