मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Maharashtra Assembly Election Results 2024) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलय. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळत आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पराभूत उमेदवारांच्या निकालांवर एक नजर टाकूयात.
क्र | मतदारसंघ | पराभूत उमेदवार | पक्ष |
---|---|---|---|
1 | संगमनेर | बाळासाहेब थोरात | कॉंग्रेस |
2 | कराड दक्षिण | पृथ्वीराज चव्हाण | कॉंग्रेस |
3 | माहीम | अमित ठाकरे | मनसे |
4 | वांद्रे-पूर्व | झिशान सिद्दिकी | राष्ट्रवादी कॉंग्रेस |
5 | तिवसा | यशोमती ठाकूर | कॉंग्रेस |
6 | वसई | हितेंद्र ठाकूर | बहुजन विकास आघाडी |
7 | अचलपूर | बच्चू कडू | प्रहार जनशक्ती पक्ष |
8 | कराड उत्तर | बाळासाहेब पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी) |
9 | सांगोला | शहजीबापू पाटील | शिवसेना |
10 | ठाणे पाचपाखाडी | केदार दिघे | शिवसेना (उबाठा) |
11 | बारामती | युगेंद्र पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी) |
12 | जालना | कैलाश गोरंट्याल | कॉंग्रेस |
13 | रिसोड | भावना गवळी | शिवसेना |
14 | घनसावंगी | राजेश टोपे | राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी) |
15 | वरळी | मिलिंद देवरा | शिवसेना |
16 | औरंगाबाद पूर्व | इम्तियाज जलील | एआयएमआयएम |
17 | रामटेक | विशाल बरबटे | शिवसेना (उबाठा) |
18 | मानखुर्द शिवाजीनगर | नवाब मलिक | राष्ट्रवादी कॉंग्रेस |
19 | आष्टी | मेहबूब शेख | राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी) |
20 | शिवडी | बाळा नांदगावकर | मनसे |
ही यादी पाहता यातील काहीजण मंत्रिपदावर राहिलेले नेते आहेत. पृथ्वीराच चव्हाण यांच्यासारखे नेते तर मुख्यमंत्रिपदावर राहिलेले आहेत. त्यांचाही पराभव झाल्याचं दिसतं. त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून ज्या नेत्यांची नावं घेतली जात होती, त्यातील बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेतेही पराभूत झाले आहेत. एवढंच नाही तर अमित ठाकरे, युगेंद्र पवार यांच्यासारखे नव्या दमाचे मात्र प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्यानं यांची नावं चर्चेत होती. त्यांचाही पराभव झाला आहे.
नोट- ही यादी अपडेट होत आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे विजयी झाल्याचे मानण्यात येते.