ETV Bharat / state

आदर्श आचारसंहितेचा भंग, आतापर्यंत 500 कोटींची मालमत्ता जप्त

आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून संपूर्ण राज्यभर स्थिर आणि भरारी सर्वेक्षण अशी 6 हजार पथकं तैनात करण्यात आलीत. याद्वारे संशयास्पद वस्तू जप्त केल्या गेल्यात.

Violation of the ideal code of conduct
आदर्श आचारसंहितेचा भंग (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 7:43 PM IST

मुंबई - 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 15 ऑक्टोबरला आचारसंहिता घोषित करण्यात आलीय. ही निवडणूक 20 नोव्हेंबरला होत असून, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून संपूर्ण राज्यभर स्थिर आणि भरारी सर्वेक्षण अशी 6 हजार पथकं तैनात करण्यात आलीत. या पथकांमार्फत केल्या गेलेल्या कारवाईत संशयास्पद वस्तू जप्त केल्या गेल्या असून,
आतापर्यंत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आलीय.

राज्यात 6 हजार पथके : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आदर्श आचारसंहितेचे पालन केले जात असताना अनेक ठिकाणी तपासणीवरून निवडणूक अधिकारी आणि राज्यातील प्रमुख नेते यांचे खटके उडत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची वणी येथे तपासणी केल्यानंतर हा विषय राज्यभर चर्चेचा झालाय. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर दिसू लागलेत. निवडणूक काळात कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये, याकरिता निवडणूक आयोगाकडून केली गेलेली तरतूद आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यरत आहेत. स्थिर आणि भरारी अशा दोन प्रकारची सर्वेक्षण पथके प्रत्येक मतदारसंघांमध्ये तैनात आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण 6 हजार पथके आणि 19 अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीय.

कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही: उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक तपास यंत्रणांवर अनेक आरोप केलेत. केवळ विरोधकांच्या बॅगांचीच तपासणी केली जाते आणि सत्ताधारी नेत्यांच्या बॅगांमधून करोडो रुपयांची ने-आण केली जाते, पण त्यांच्या बॅगा तपासल्या जात नसल्याचा आरोप उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यानंतर आता सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्या बॅगा तपासतानाचे व्हिडीओ समोर आणले. वास्तविक निवडणूक काळात अनेक पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक वेळेची बचत करण्यासाठी हवाई मार्गाने दौरे करतात. यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टर्स आणि विमानांचीसुद्धा तपासणी केली जाते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल आणि इतर विभागाचे कर्मचारीसुद्धा असतात. तसेच तपासणी करताना कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. अशामध्ये जर का पैसे, दारू, मौल्यवान धातू अशा संशयास्पद वस्तू आढळल्या तर त्या नियमाप्रमाणे जप्त करून त्यावर कारवाई केली जाते.

सी - व्हीजिल ॲपद्वारे तक्रार करावी : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत राज्यातील स्थिर आणि भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतींची मालमत्ता जप्त केली गेली असून, हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार या शंका नाही? याकरिता जर अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने मतदारांची मते मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला, तर नागरिकांनी सी-व्हीजिल ॲपद्वारे तक्रार करावी, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलंय.

हेही वाचा..

  1. "मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे"; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' कृतीवर काँग्रेसची टीका
  2. "मी कॉमनमॅन सर्वसामान्यांना बनवणार सुपरमॅन"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.