मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आज (26 ऑक्टोबर) त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये 15 नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मुंबईतील पाच जागांचा समावेश असून वडाळामधून भाजपाचे कालिदास कोळंबकर यांच्यासमोर माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवडीमधून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सुधीर साळवी यांनी शिवडी येथून लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडं आग्रह धरला होता. परंतु, येथून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे गटानं पहिल्या यादीत 65 नावांची घोषणा केली होती. तर आता 15 नावांची घोषणा करण्यात आलीय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात तिन्ही पक्षाला प्रत्येकी 90 जागांचा फॉर्म्युला ठरलाय. तर उर्वरित 18 जागा मित्र पक्षाला देण्यात येणार आहेत. अशात उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप 10 जागा घोषित करणं बाकी असून या जागांवरुनच महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.
जागा वाटपात अदलाबदली : उद्धव ठाकरेंनी घोषित केलेल्या पहिल्या 65 उमेदवारांच्या नावांच्या यादीत बदल केला जाईल, असं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. याचाच अर्थ अनेक ठिकाणी जागांची अदलाबदली होऊ शकते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या बातमीला दुजोरा दिला होता. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बोलणी सुरू असून काही जागांची अदलाबदल होऊ शकते असं ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडं महाविकास आघाडीचे घटकपक्ष समाजवादी पार्टी, शेकाप यांना अद्याप त्यांच्या मनासारख्या जागा न मिळाल्यानं ते नाराज आहेत.
दुसऱ्या यादीतील घोषित 15 उमेदवारांची नावं :
- धुळे शहर - अनिल गोटे
- चोपडा - राजू तडवी
- जळगाव शहर - जयश्री सुनील महाजन
- बुलडाणा - जयश्री शेळके
- दिग्रस - पवन श्यामलाल जयस्वाल
- हिंगोली - रुपाली राजेश पाटील
- परतूर - आसाराम बोराडे
- देवळाली - योगेश घोलप
- कल्याण पश्चिम - सचिन बासरे
- कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
- वडाळा - श्रद्धा श्रीधर जाधव
- शिवडी - अजय चौधरी
- भायखळा - मनोज जामसुतकर
- श्रीगोंदा - अनुराधा राजेंद्र नागावडे
- कणकवली - संदेश भास्कर पारकर
हेही वाचा -