ETV Bharat / state

सुधांशू त्रिवेदी खरी माहिती असल्याशिवाय आरोप करत नाहीत, विनोद तावडेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

खासदार सुधांशू त्रिवेदी हे इतके अभ्यासू आहेत की त्यांच्याकडे पूर्ण सत्य माहिती असल्याशिवाय ते कधी असे आरोप करत नाहीत, असा टोलाही विनोद तावडे यांनी लगावलाय.

Vinod Tawde voted
विनोद तावडेंनी मतदान केलं (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 11:07 AM IST

Updated : Nov 20, 2024, 11:43 AM IST

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज मुंबईत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय. काल १९ नोव्हेंबर रोजी विरार येथे विवांता या हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. त्यावरून विनोद तावडे राज्यभर चर्चेत आले. विनोद तावडे यांनी आज मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

मी पैसे वाटण्यासाठी तिथे गेलो नव्हतो: पैसे वाटपाच्या विषयावर भाष्य करताना ते म्हणाले की, असा कुठल्याही प्रकारचा पैसे वाटण्याचा प्रकार तिथे झालेला नाही आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या सोबत चहापान करण्यासाठी तिथे गेलो होतो. परंतु तिथे भलताच प्रकार घडून आला. मी कुठल्याही पद्धतीचे पैसे वाटण्यासाठी तिथे गेलो नव्हतो आणि तसं काही झालेलं नाही. यामागे कोणाची साजिश आहे काय हे अद्याप मला माहीत नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच कोटी सापडल्याचा दावा केला आहे. तो त्यांनी कुठून केला, कसा केला हे त्यांनाच माहीत. परंतु खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळेंवर क्रिप्टोकरन्सीबाबत जे आरोप लावले आहेत. मला इतकी माहिती आहे की, खासदार सुधांशू त्रिवेदी हे इतके अभ्यासू आहेत की त्यांच्याकडे पूर्ण सत्य माहिती असल्याशिवाय ते कधी असे आरोप करत नाहीत, असा टोलाही विनोद तावडे यांनी लगावलाय.

विनोद तावडे (source- vinod tawde)
नेमकं प्रकरण काय? : भाजपाचे राष्ट्रीय सचिवविनोद तावडे मंगळवारी नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपाचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्यांच्यात बैठकही सुरू असतानाच बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले. याठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर नालासोपाऱ्याचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना याची माहिती दिली होती. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपाकडून पैशांचा गैरवापर होतोय आणि हे दुर्दैवी आहे, असं म्हणत क्षितिज ठाकूरांनी संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकणाऱ्या कर्णधाराला संघात स्थान नाही; नव्या कर्णधारासह श्रीलंका संघाची घोषणा
  2. असं कसं! खेळपट्टीवर घालवले 2 तास, 77 चेंडू खेळून झिरोवर आऊट, तरीही ठरला सामन्याचा 'हिरो'

Last Updated : Nov 20, 2024, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.