मुंबई - मागील 15 दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुमधडाका लावणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबईवरसुद्धा लक्ष केंद्रित केलंय. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांना हैदराबादी भाषेत टोला लगावत.. मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधर को मता आना, इधर को तुम्हारा कोई काम नही है, असं सांगितलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबच्या मुद्द्यावर बोलताना, अरे सुन ले ओवैसी कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो तिरंगा लहरायेगा पुरे पाकिस्तान पर..., असा टोला ओवैसींना लगावलाय. मुंबईतील भाजपाच्या वर्सोव्याच्या उमेदवार भारती लव्हेकर, जोगेश्वरीच्या भाजपाच्या उमेदवार विद्या ठाकूर आणि मालाड मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार विनोद शेलार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय.
औरंगजेबाचं महिमामंडन केलं जातं: याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हल्ली ते ओवैसीसुद्धा राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. मला त्यांना इतकंच सांगायचं आहे, मेरे हैदराबादी भाई उधर ही रहना इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई काम नही है, असा चिमटा फडणवीस यांनी ओवैसींना काढलाय. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेत की, इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जातात. औरंगजेबाचं महिमामंडन केलं जातं. अशा लोकांना मला सांगायचं आहे, जो हिंदुस्थानचा सच्चा मुसलमान आहे, तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता आणि त्याने आमच्यावर अनेक आक्रमणे केलीत. म्हणून मी म्हणतोय, अरे सुन ले ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर.
आम्ही करून दाखवले: तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केलीय. ते म्हणालेत की, पूर्वी काँग्रेस सरकारने 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. परंतु त्यानंतरच्या आमच्या महायुती सरकारने 5 वर्षांमध्ये 354 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले असून, यापैकी 100 किलोमीटरचे काम पूर्णत्वासही गेलेय. मराठी माणसाला बेघर करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय. पत्राचाळीमध्ये भ्रष्टाचार केला गेला असून, मुंबईतील मराठी माणसाला बेघर केलं गेलंय. यांनी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही नव्याने मंजुरी देऊन मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर मिळेल हे महायुती सरकारने करून दाखवल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचा-