ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : नागपुरातलं राजकारण कूस बदलणार? देवेंद्र फडणवीसांची घरच्या मैदानातच कसोटी - NAGPUR SOUTH WEST CONSTITUENCY

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ भाजपा पक्षाचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र, त्यानंतर आता भाजपाच्या मतांमध्ये सातत्यानं घट होत असल्यामुळं देवेंद्र फडणवीसांना आपल्याच मतदारसंघात संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 devendra fadnavis bjp stronghold political history in Nagpur South West Assembly constituency
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा निवडणूक 2024 (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 12:35 PM IST

नागपूर : नागपूरमध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राज्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून याकडं केवळ नागपूरकरांचंच नव्हे, तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलय. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिलाय? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी आपण जाणून घेऊया.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 साली झाली. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरवलं. तेव्हापासून आजपर्यंत फडणवीस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय. सलग तीनवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांमध्ये घट झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं प्रबळ उमेदवार दिल्यास देवेंद्र फडणवीसांना आपल्याच मतदारसंघात संघर्ष करावा लागू शकतो.

2019 च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? : 2009 सालापासून दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचं प्राबल्य आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आशिष देशमुख हे फडणवीसांच्या विरोधात होते. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना 56.86 टक्के म्हणजेच 1 लाख 9 हजार 237 मतं मिळाली होती. तर आशिष देशमुख यांना 31.18 टक्के म्हणजेच 59 हजार 893 मतं मिळाली होती. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना विजय मिळाला असला तरी त्यांची मतं जवळपास दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं बघायला मिळालं होतं.

2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदान -

2014 : देवेंद्र फडणवीस- 1, 13, 918
प्रफुल गुडधे,काँग्रेस- 54, 976

2019 : देवेंद्र फडणवीस- 1, 09, 237
आशिष देशमुख, काँग्रेस- 59, 893

2019 च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? : 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला 1 लाख 20 हजार 185 मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नितीन गडकरी यांना 1 लाख 99 हजार 257 मतांपैकी केवळ 1 लाख 13 हजार 501 मतंच मिळाली. तर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या वाट्याला 79 हजार 966 मतं आली. त्यामुळं गडकरी यांचं मताधिक्य केवळ 33 हजार 535 इतकंच आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतं -

भाजपा : 1,13,501 (वर्ष 2024)
1,20,185 (वर्ष 2019)
1,06,725 (वर्ष 2014)

काँग्रेस : 79,966 (वर्ष 2024)
65,061 (वर्ष 2019)
44,002 (वर्ष 2014)

कॉंग्रेसमधून इच्छुक उमेदवार कोण? : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या 4 वर्षांमध्ये बरेच उलटफेर झाले. कधीकाळी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दंड थोपटणारे आशिष देशमुख आता भाजपावासी झालेत. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात माजी नगरसेवक आणि कॉंग्रेस नेते प्रफुल गुडधे इच्छुक आहेत. प्रफुल गुडधे यांनी 2014 मध्येही फडणवीस यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याचा दावा : मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मतदारसंघातून सलग आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांच्या कार्यकाळात या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलल्याचा दावा भाजपा तर्फे करण्यात येतोय. 2009 मध्ये काँग्रेस सत्तेत असताना फडणवीसांनी या मतदारसंघात झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले. यंदाही अगोदरपेक्षा अधिक मताधिक्यानं देवेंद्र फडणवीस निवडून येतील, असा दावा भाजपा नेते संदीप जोशी यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस मतदारसंघात सक्रिय : 2014 पासून मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जबाबदारी आली असली तरी त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाकडं दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मात्र, सत्ता असल्यानं बेफिकीर झालेल्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळं लोकसभेत भाजपाला फटका बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळं आता पुढील निवडणुकीत दुर्लक्ष होऊ नये यासाठी अलीकडच्या दिवसात फडणवीसांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिलाय. त्यामुळं येत्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार राजा कुणाच्या पारड्यात मतं टाकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. आगामी विधानसभा निवडणूक 2024 फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे, तर 'या' नेत्यांच्या नेतृत्वात लढवणार भाजपा - Assembly Election 2024
  2. महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा वाजणार बिगुल, दुपारी निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक होणार जाहीर
  3. विधानसभेचा 'फड' गाजवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांविरोधात मनसे देणार उमेदवार; नावही ठरलं - MNS Vs Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.