ETV Bharat / state

'मित्रा'चा आदेश न आल्याने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय खोळंबला; नाना पटोले यांचा आरोप - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

'मित्रा'चा आदेश न आल्याने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय खोळंबल्याची टीका नाना पटोले यांनी केलीय. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील बॅलेट यात्रा राज्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

nana patole
नाना पटोले (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 5:00 PM IST

मुंबई- राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अजून त्यांच्या 'मित्रा'चा आदेश न आल्याने मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय खोळंबला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. ते मुंबईत टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मतपत्रिकेवर मतदानाच्या मागणीसाठी काँग्रेस पुढील दोन दिवसांत राज्यव्यापी स्वाक्षरी अभियान राबवणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीय. कोट्यवधी जनतेच्या स्वाक्षरी जमवल्यानंतर त्या राष्ट्रपती, निवडणूक आयोग, सरन्यायाधीश यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. मतपत्रिकेवर मतदान होण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा दिल्लीत काल काँग्रेसच्या नेतृत्वाने केलीय.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील बॅलेट यात्रा: राज्यातील जनतेमध्ये मत वाया जात असल्याची भावना निर्माण झाल्याने उद्रेक निर्माण झालाय, असा दावाही नाना पटोले यांनी केलाय. ज्या व्यक्तीला मत दिले, त्याला ते मत मिळालेलं नाही, अशी जनतेची भावना झालीय. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील बॅलेट यात्रा राज्यात येईल, तेव्हा मोठ्या संख्येने जनता त्यामध्ये सहभागी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.

गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचा ठराव मंजूर: काँग्रेसचा विधानसभेतील गटनेता आणि प्रतोद नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलीय.

लोकशाही वाचवण्याची लढाई लढणार : राज्यातील निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर भूमिका मांडलीय. लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. मतदारांनी दिलेल्या मताचा वापर योग्य व्हावा ही जनभावना आहे, त्यामुळे ही लढाई काँग्रेस लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. लोकांमध्ये संशय आहे, लोकशाहीत जनतेचा कौल, जनता महत्त्वाची आहे, त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी लढा देण्यात येणार आहे. ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकीय असल्याची टीका पटोले यांनी केली. शिवसेना उबाठा स्वबळावर लढणार असल्याच्या प्रश्नाबाबत प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे पटोले म्हणाले.

नेतृत्व बदलाचा निर्णय हायकमांडचा: या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला अनुपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बाळासाहेब थोरात, मुजफ्फर हुसेन, कुणाल पाटील, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, असलम शेख, कुमार केतकर, अमिन पटेल, नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह आमदार उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी हा निकाल जनतेचा आहे का हा प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. हा जनमताचा की ईव्हीएमचा कौल आहे हे कळत नाही. महायुतीचा झालेला विजय जनतेच्या पचनी पडत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. नेतृत्व बदलाचा निर्णय हायकमांडचा निर्णय आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. हा निकाल अपेक्षित नसल्याची प्रत्येक गावातून प्रतिक्रिया येत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा

  1. साईबाबा संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ येणार; राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी?
  2. 'एकनाथ शिंदे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांना करा मुख्यमंत्री'; चंद्रकांत पाटलांनी कशामुळे व्यक्त केला विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.