मुंबई- राज्य विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मागे टाकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात थेट लढत असलेल्या बहुतांश जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा)च्या नेतृत्वाखालील महायुतीला 288 जागांपैकी 217 जागांवर आघाडी मिळालीय. तर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये महाविकास आघाडी (MVA) 60 जागांवर पुढे आहे. वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत, तर कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत.
शिंदेंची शिवसेना 56 जागांवर आघाडीवर - एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 81 जागांवर निवडणूक लढवली होती. यामध्ये ते 56 जागांवर आघाडीवर आहेत. तर 95 जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची गाडी केवळ 20 जागांवर अडकलीय. मुंबईतील 10 जागांवर हे दोन्ही शिवसेना आमनेसामने आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त मुंबईत 10 जागांवर शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट एकमेकांसमोर आहेत. माहीमच्या पारंपरिक जागेचाही या जागांमध्ये समावेश आहे. माहीममधून शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महेश सावंत यांच्याशी थेट लढत आहे. माहीम आणि वरळीच्या जागांव्यतिरिक्त हे दोन्ही गट आमनेसामने असलेल्या जागांमध्ये जोगेश्वरी पूर्व, मागठाणे, कुर्ला, विक्रोळी, दिंडोशी, चेंबूर आणि अंधेरी या जागांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे v/s उद्धव ठाकरे, कोण जिंकतंय निवडणूक? | ||
विधानसभा मतदारसंघ | शिवसेना(शिंदे गट) | शिवसेना (उद्धव ठाकरे) |
भायखळा | यामिनी जाधव | मनोज जामसुतकर |
वरळी | मिलिंद देवरा | आदित्य ठाकरे |
माहीम | सदा सरवणकर | महेश सावंत |
जोगेश्वरी पूर्व | मनीषा वायकर | अनंत नर |
मागाठाणे | प्रकाश सुर्वे | उदेश पाटकर |
कुर्ला | मंगेश कुडाळकर | प्रवीणा मोराजकर |
विक्रोळी | सुवर्णा कारंजे | सुनील राऊत |
दिंडोशी | संजय निरुपम | सुनील प्रभू |
चेंबूर | तुकाराम काटे | प्रकाश फातर्फेकर |
अंधेरी पूर्व | मुरजी पटेल | ऋतुजा लटके |
भांडुप | अशोक पाटील | रमेश कोरगावकर |
शिवडी | - | अजय चौधरी |
कोपरी पाचपाखाडी | एकनाथ शिंदे | केदार दिघे |
अंबरनाथ | बालाजी किणीकर | राजेश वानखेडे |
कल्याण पूर्व | विश्वनाथ भोईर | सचिन वसारे |
भिवंडी ग्रामीण | शांताराम मोरे | महादेव घटळ |
कल्याण ग्रामीण | राजेश मोरे | सुभाष भोईर |
ओवळा माजीवाडा | प्रताप सरनाईक | नरेश मनेरा |
हेही वाचा -