ETV Bharat / state

महिलांचा डंका! राज्यात 426 मतदान केंद्रांवर महिलांचंच राज्य - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात 426 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' याची स्थापना करण्यात आलीय. या मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी हे महिलाच असणार आहेत.

426 polling stations in the state are ruled by women
राज्यात 426 मतदान केंद्रांवर महिलांचंच राज्य (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 5:08 PM IST

मुंबई - राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे, तर याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मतदानाला अवघे 6 दिवस उरले असताना आता निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर जोरदार तयारी करण्यात येत आहे. मतदान केंद्रावरील मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून, युद्ध पातळीवर व्यवस्थाचे नियोजन करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध सामाजिक संस्था देखील विविध उपक्रम राबवत असतात. दरम्यान, राज्यातील 426 मतदान केंद्रावर महिलांचेच राज्य दिसून येणार आहे. कारण राज्यात 426 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' याची स्थापना करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी हे महिलाच असणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढणार का? याबाबत चर्चांना उधाण आलंय.

महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नशील : देशातील निवडणुकात 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापित करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. याची अंमलबजावणी म्हणून देशातील विविध राज्यात 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापित करण्यात आलेत. याचाच एक भाग म्हणून राज्यात 426 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' असणार आहेत. या मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस या सर्वाची जबाबदारी महिलाच पार पाडणार आहेत. मतदान केंद्रावर महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलंय. दरम्यान, मतदान प्रक्रियेत महिलांचा अधिक सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय. महिला नियंत्रित मतदान केंद्र निवडताना ती संवेदनशील केंद्र टाळून जिथे पोलीस ठाण्याच्या जवळपास किंवा तहसील कार्यालयाच्या जवळपास असणारे 'महिला नियंत्रित मतदान केंद्रा'ची निवड करण्यात आलीय. तसेच हे केंद्र निवडताना सुरक्षितता यालाही प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलंय.

राज्यात 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' कुठे आणि किती? : राज्यात सर्वांधिक 45 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' हे नाशिक जिल्ह्यात असणार आहेत. जळगावमध्ये 30, गोंदिया जिल्ह्यात 32, सोलापूर जिल्ह्यात 29, मुंबई उपनगरमध्ये 26, पुणे जिल्ह्यात 21, ठाणे जिल्ह्यात 18, सातारा जिल्ह्यात 17, औरंगाबाद जिल्ह्यात 13, नागपूर जिल्ह्यात 13, अहमदनगर जिल्ह्यात 12, मुंबई शहरात 12, कोल्हापूर जिल्ह्यात 10, चंद्रपूर, नांदेड, रायगड आणि वर्धा जिल्ह्यात 9, अमरावती, बीड, सांगली, भंडारा, परभणी या जिल्ह्यात 8 तर बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात 7, अकोला, जालना, रत्नागिरी, लातूर आणि पालघर जिल्ह्यात 6, धुळे जिल्ह्यात 5, नंदुरबार, उस्मानाबाद या ठिकाणी 4, वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि हिंगोली या ठिकाणी 3 महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करण्यात आलीत.

हेही वाचा -

  1. पोर्श कार अपघात प्रकरणावरुन सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हिंमत असेल तर..."
  2. "तुम्ही खुनी आहात, कुठल्या तोंडानं मतं मागणार?"; सुप्रिया सुळेंचा सुनील टिंगरेंवर निशाणा - Supriya Sule On Sunil Tingre
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.