ETV Bharat / state

हरवलेला श्वान पुन्हा स्वगृही परतला, गावकऱ्यांनी काढली मिरवणूक - Maharaj dog story

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 3:01 PM IST

Updated : Jul 29, 2024, 4:25 PM IST

Maharaj Dog Kolhapur : विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला गेलेला श्वान तेथे हरवला. विशेष म्हणजे तो श्वान दोन दिवसात घरी परतला. गावी परतलेल्या या श्वानाचा हार घालून पूजन केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. वाचा सविस्तर...

Maharaj dog story
हरवलेला श्वान परतला स्वगृही (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Maharaj Dog Kolhapur : आषाढी एकादशी म्हणजे लाखो वैष्णवांसाठी स्वर्गसुख! लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी, त्याचं साजिरं रुप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी, हजारो वारकरी पंढरीची अखंड वाट चालत पंढरीला पोहोचतात. विठू-रखुमाईच्या भेटीची अनिवार ओढ त्यांना पंढरपूर दरबारी खेचून नेते. वारीची अनुभूती अविस्मरणीय असते. यंदाची वारी कोल्हापुरकरांसाठी अविस्मरणीय ठरण्यासाठी आणखी एक कारण घडलं. संतसंगतीचं महत्त्व संतश्रेष्ठ तुकोबारायांनी आपल्या अभंगातूनही पटवून दिलं.

संत तुकोबा म्हणतात -

"संत समागम एखादिये परी ।

व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती ।।

बहुतेक तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेली संतसंगती प्राप्त करण्यासाठी कोल्हापुरच्या वारकऱ्यांबरोबर पाळीव श्वानानंही कोल्हापुरातल्या नानीबाई चिखली ते पंढरपूर असा 225 किलोमीटरची वारी पायी चालत पूर्ण केली. 'महाराज' असं या श्वानाचं नाव, मात्र पंढरपुरातून तो हरवला आणि आश्चर्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच श्वान एकटाच घरी परतला. विठ्ठलानंच 'महाराजा'ला वाट दाखवली, अशी वारकऱ्यांची भावना न होते तरच नवल!

हरवलेला श्वान पुन्हा स्वगृही परतला (Source : ETV Bharat Reporter)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील निपाणी जवळच्या यमगर्णी गावचे ज्ञानेश्वर कुंभार गेली 30 वर्ष कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील नानीबाई चिखली ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. त्यांच्या घरी त्यांचा पाळीव श्वान आहे. कुंभार हे वारकरी संप्रदायाचे असल्यानं गावातील विठ्ठलाच्या मंदिरातही श्वान त्यांच्यासोबत नेमाने जातो. यंदाही गावातून 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान पायी दिंडी निघाली. या दिंडीतही 'महाराज' हा श्वान कुंभार यांच्याबरोबर वारीतून चालत पंढरपुरच्या दिशेने रवाना झाला. या श्वानानं 225 किलोमीटरचं अंतर वारकऱ्यांबरोबर पूर्ण केलं. मात्र, पंढरपुरात लाखोंच्या गर्दीत हा श्वान हरवला. पंढरपुरात कुंभार कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या श्वानाला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना दोन दिवसांनी रिकाम्या हातानंच घरी परतावं लागलं. दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पूर्ण करुन वारीत गेलेला श्वान न मिळाल्यानं कुंभार कुटुंबीय हताश झालं. दरम्यान, गावकऱ्यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट केली. गेली आठवडाभर श्वानाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की, दोनच दिवसांपूर्वी महाराज श्वान गावी परतला. एकटाच. हरवलेला लाडका श्वान घरी परतल्यानं कुंभार कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. गावकऱ्यांनी तर या श्वानाची गावातून जंगी मिरवणूक काढली. गावी परतलेल्या या श्वानाचं हार घालून पूजन केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि प्रत्येकाच्या मनात साक्षात विठ्ठलानंच पाळीव श्वानाला वाट दाखवली, ही भावना अधिक गहिरी झाली.

हे घडलं कसं? याचं शास्त्रीय विवेचन करताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सॅम लुद्रीक यांनी माहिती दिली की, "पाळीव प्राणी आपल्या कार्यक्षेत्रातून विशिष्ट ठिकाणी मलमूत्र सोडतात. सोडलेल्या मलमूत्राच्या वासातून पुढं जाण्याची दिशा स्पष्ट होते. पंढरपुरला गेलेला हा श्वान जर चार चाकी वाहनातून गेला असता तर तो परतीच्या वाटेनं आलाच नसता. मात्र, तो दिंडीतून चालत गेल्यानं ठिकठिकाणी त्यानं सोडलेल्या मलमूत्राच्या खुणा, त्याला परत त्याच ठिकाणी घेऊन आल्या आहेत. बहुतांश प्राणी नैसर्गिकरित्या हे करतात,"

गावातील धार्मिक कार्यक्रमात 'महाराज' ची उपस्थिती अनिवार्यच: यमगर्णी गावात मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदाय आहे. गावात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी वारकरी ज्ञानेश्वर कुंभार यांच्याबरोबर 'महाराज' हा श्वान नेहमी असतो. गावकऱ्यांनी मुक्या प्राण्याचा अनाकलनीय धार्मिक ओढा पाहून 'महाराज' असं नामकरण केलं आहे. तर जाता-येता गावकऱ्यांनी 'महाराज' अशी हाक दिल्यावर कान टवकारून, शेपूट हलवत श्वान 'महाराज'ही प्रतिसाद देतो. याआधी ज्योतिबा आणि पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी दिंडीही या श्वानानं चालत पूर्ण केली आहे.

हेही वाचा

  1. आषाढी एकादशीच्या सोहळ्यास उत्साहात सुरुवात; विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी - Ashadhi Wari 2024
  2. ‘याचि देही याचि डोळा'!; इंदापुरात पार पडले तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण; पाहा गोल रिंगणाचे ड्रोन दृश्य - Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala

Last Updated : Jul 29, 2024, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.