मुंबई Mahant Giri On Uddhav Thackeray : सोमवारी उद्धव ठाकरे यांनी आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मातोश्री निवस्थानी बोलून विधिवत पूजा केली. तसंच त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधला. "उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला आहे. याचं दुःख अनेकांना आहे. त्यांनी विनंती केल्यानंतर 'मी' मातोश्रीवर आलोय. पण, उद्धव ठाकरे जोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत, तोपर्यंत अनेकांच्या मनातीला दुःख जाणार नाही. असली हिंदुत्व, नकली हिंदुत्व कोणाचं आहे, याचाही शोध घ्यावा लागेल. उद्धव ठाकरे यांचं असली हिंदुत्व आहे. ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला. त्यांचं असली हिंदुत्व असू शकत नाही", असं आद्य शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. मात्र शंकराचार्य यांच्या 'या' वक्तव्यावर विविध अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली : शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी झाल्याचं म्हटलंय. शंकराचार्यांच्या वक्तव्यावर पंचनाम जूना अखाडाचे प्रवक्ते, श्री महंत नारायण गिरी यांनी टीका केली आहे. खरी गद्दारी, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांशी केली आहे. त्यांचे वंदनीय पिताजी बाळासाहेब ठाकरे हे कडवट हिंदुत्वाचे विचारवंत होते. परंतु या सर्वाला बगल देऊन विरोधी विचारधारा असलेल्या लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे बसले. त्यामुळं खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे यांचा कोणीही विश्वासघात केला नाही आहे. पण, शंकराचार्यांनी विचार करून बोललं पाहिजे. आम्ही त्यांचा आदर करतो. पण धर्म देशापेक्षा संत मोठे नाहीत, असं महंत नारायण गिरी यांनी म्हटलं आहे.
राज्यातील जनता ठरवेल : महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी झालीय की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गद्दारी झालीय, हे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनताच ठरवेल. परंतु ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची गद्दारी केली, सनातनबरोबर गद्दारी केली, यावर देखील शंकराचार्यांनी बोललं पाहीजे, असं आचार्य प्रमोद कृष्ण यांनी केली आहे.
'हे' वाचलंत का :
- 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024
- विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत झाला असता भूकंप; अनेक खुलासे आले समोर - Maha Vikas Aghadi Vidhan Parishad
- 'लाडक्या बहिणी'साठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदाच्या रक्षाबंधनला भेटणार मोठी ओवाळणी - Mazi Ladki Bahin Yojana