ETV Bharat / state

महाविकास आघाडी राज्यातलं 'एमबीबीएस' सरकार बदलणारच; सुप्रिया सुळेंचा विश्वास; काय आहे MBBS भानगड? - Vidhan Sabha Election 2024 - VIDHAN SABHA ELECTION 2024

Vidhan Sabha Election 2024 : गुरूपौर्णिमेनिमित्त खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) रविवारी कराडमध्ये प्रीतीसंगमावर जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. राज्यातील एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार यावेळी महाविकास आघाडी बदलणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Supriya Sule News
खासदार सुप्रिया सुळेंनी घेतलं यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाचं दर्शन (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 10:00 PM IST

सातारा Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकार हद्दपार करून महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची गरज आहे. येत्या निवडणुकीत महाविकास अघाडी हे सरकार निश्चित बदलेल, असा ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (ETV BHARAT Reporter)

यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं : खासदार सुप्रिया सुळेंनी गुरूपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, प्रीतीसंगमावरील या पवित्र स्मृतिस्थळी आशीर्वादासाठी कोणी येतं की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, आपल्यापेक्षा वयाने, पदाने, कर्तृत्वाने जे मोठे असतात, त्यांचा आशीर्वाद मिळणे हे माइयासाठी मोठं भाग्य आहे. मी काहीही मागितलं नाही. मी कधी मागत नाही. आपण मोठ्या लोकांना काय मागणार? ते जे देतील ते आपल्या पदरात घ्यायचं आणि पुढे जायचं.

पुणे हे राज्याचे क्राईम कॅपिटल : एक काळ असा होता की, महाराष्ट्राकडं आदर्श राज्य म्हणून पाहायलं जायचं. पण, आज केंद्र सरकारचा डेटा पाहा. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो, तेव्हा क्राईम वाढतो, असा थेट आरोप सुप्रिया सुळेंनी केला. भाजपाच्या पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नागपूरमध्ये क्राईम जास्त होते. पण, आता पुणे हे राज्याचं क्राईम कॅपिटल झालंय. सगळ्यात जास्त क्राईम पुणे जिल्ह्यात असल्याचं डेटा सांगतो, असंही सुळे म्हणाल्या.

सरकार कोणतंही असो, आरक्षणाला आमचा पाठिंबा : आरक्षणाच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागण्यात आहेत. त्याचं एक कन्सॉलीडेटेड बील सरकारने करावं. कुठलंही सरकार असलं तरी आम्ही त्याला पूर्ण ताकदीने पाठिंबा देऊ, असंही सुळे यांनी सांगितलं. धनगर आरक्षणावरून भाजपानं रान उठवलं होतं, त्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. "...त्यावेळी आम्ही बारामती बारामती केलं का?"; सुप्रिया सुळे-सुनिल शेळकेंमध्ये खडाजंगी - Sunil Shelke Vs Supriya Sule
  2. "आयएएस अधिकारी पूजा खेडकर..." ; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Pooja Khedkar Case
  3. 1 हजार 500 रुपयांत काय होणार? 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रिया सुळेंनी महायुतीला सुनावलं - Majhi Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.