ETV Bharat / state

मान्सूनपूर्वी मुंबई मेट्रो सज्ज, प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्षाची सुरुवात - Mumbai Mansoon

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 11:21 AM IST

Updated : Jun 2, 2024, 2:54 PM IST

Mumbai Is Ready For Monsoon पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचा प्रवास सुरळीत व्हावा याकरिता मंबई महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महा मुंबई मेट्रोकडून अत्याधुनिक आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे..

Mumbai Is Ready For Monsoon
मुंबई मान्सूच्या अनुषंगाने आपत्कालीन कक्ष (ETV Bharat Reporter)

मुंबई Mumbai Is Ready For Monsoon: पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास सहन करावं लागू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. त्यासोबतच चाकरमानांना देखील सुरळीत प्रवास करता यावं म्हणून रेल्वेच्या तिन्ही विभागाकडून मान्सून पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. तसच अल्पावधीत लोकांच्या पसंतीला उतरलेल्या मुंबई महा मेट्रो प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायक प्रवास यावं याकरिता मान्सूनच्या अनुषंगानं महा मुंबई मेट्रोकडून अत्याधुनिक आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

मेट्रो कडून हॉटलाइन कार्यान्वित: पावसाळ्याच्या काळात मेट्रो प्रवाशांना सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो सह मोनोरेलची सेवा देखील अविरत सुरू राहावी यासाठी अत्याधुनिकयुक्त मान्सून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती दरम्यान समन्वयासाठी मुंबई पालिकेनं आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत हॉटलाइन कार्यान्वित केलं. पूरस्थिती सारख्या आपत्तीच्या वेळी रस्ते वाहतूक ठप्प होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मेट्रो आणि मोनोच्या फेऱ्यांची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हे आहेत हेल्पलाईन क्रमांक: मुंबई मेट्रो आणि मोनो प्रवासी आपत्कालिन परिस्थितीत १८००८८९०५०५/ १८००८८९०८०८ या हेल्पलाइनद्वारे संपर्क साधू शकतात. त्यासोबतच ८४५२९०५४३४ या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून मोनोरेलच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाशी देखील आपण संपर्क साधू शकतात, असं आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या दहा मेट्रो स्थानकांवर ॲनिमोमीटर बसविण्यात आले आहेत. ॲनिमोमीटर माध्यमातून वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजता येणार आहे. मेट्रोची कुशल टीम 24 तासात 3 शिफ्ट मध्ये काम करणार आहेत. मेट्रोने प्रत्येक मेट्रो स्थानकावर 64 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे प्लॅटफॉर्म, स्थानका खालील रस्ता आणि कॉन्कोर्सेस लेव्हल यांसारखी महत्त्वाची क्षेत्र कव्हर करतात. या कॅमेरांच्या मध्यामातून ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे चोवीस तास पाळत ठेवली जाईल.

दुरुस्तीसाठी सर्व आवश्यक साहित्य आणि उपकरणे उपलब्ध: मेट्रो - मोनो स्थानक आणि डेपो मधील मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची सर्व कामं पूर्ण झाली. महा मुंबई मेट्रोने मेट्रो आणि मोनो ट्रेन, स्थानक, प्लॅटफॉर्म, सिग्नलिंग, इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन उपकरणं, त्यासोबतच मेट्रोच्या चारकोप डेपो आणि मोनोच्या वडाळा डेपोमधील सर्व मान्सूनपूर्व देखभालीची कामं यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. मोठ्या आणि किरकोळ दुरुस्तीसाठी सर्व आवश्यक साहित्य आणि उपकरणं डेपोमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच मेट्रो व्हायाडक्ट आणि डेपोच्या बॅलेस्टेड आणि बॅलेस्टलेस ट्रॅकवर सखोल तपासणी केली गेली आहे. तसेच फायर प्रोटेक्शन सिस्टीम, ड्रेनेज लाईन, पॉवर फेल्युअर प्रोटेक्शन सिस्टम चेकिंग पूर्ण झालं आहे. त्यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना हवामान बदल संदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याची तयारी- मुंबई मेट्रो रेल आणि मोनोरेलच्या सेवांमध्ये व्यत्यय आणणारे त्यासोबत धोकादायक ठरणारे फ्लेक्स, होर्डिंग्ज किंवा मोठे बॅनर यांची तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ठिकाणी झाडांच्या फांद्यादेखील छाटल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याची तयारीही करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.

हेही वाचा

  1. Weather Today: मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईत विविध घटनांत दहा जणांचा मृत्यू, 3 जिल्ह्यांना आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
  2. Maharashtra monsoon 2022 : संपूर्ण राज्यात व्यापला मान्सून, आजपासून जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Last Updated : Jun 2, 2024, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.