ETV Bharat / technology

डिसेंबरमध्ये लॉंच होणार 'हे' स्मार्टफोन, स्मार्टफोनमध्ये काय आहे खास?, जाणून घ्या .. - SMARTPHONES LAUNCHING IN DECEMBER

नवीन फोन घेणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना चांगला असणार आहे. कारण या महिन्यात अनेक बजेटमधील चागंले फ्लॅगशिप फोन लॉंच होणार आहेत. चला जाणून घेऊया माहिती...

iQOO 13
iQOO 13 (iQOO 13)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 25, 2024, 11:21 AM IST

हैदराबाद : नोव्हेंबरमध्ये चीनच्या बाजारपेठेत अनेक चांगले फोन लॉंच करण्यात आले. आता हे फोन भारतात लॉंच होणार आहेत. हे फोन डिसेंबरमध्ये लॉंच होतील. काही आगामी फोनचे स्पेसिफिकेशन आणि लॉंचची तारीख समोर आली आहे, तर काहींचे तपशील येणं बाकी आहे. या सर्व आगामी स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया...

iQOO 13 : iQOO 13 चायनीज मार्केटमध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह लॉंच करण्यात आला. आता कंपनी 3 डिसेंबर रोजी भारतीय ग्राहकांसाठी हा फोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये चीनी व्हेरियंट प्रमाणेच वैशिष्ट्ये असतील. फोनला 16GB रॅम आणि 120W चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,000 mAh बॅटरी मिळेल. तसंच, 6.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले उपलब्ध असेल. यात 32MP सेल्फी कॅमेरा असेल.

Redmi Note 14 सीरीज : Redmi Note 14 सीरीज भारतात लवकरच लॉंच होईल. या सीरीज अंतर्गत, Redmi Note 14 Pro, Redmi Note 14 Pro Plus, आणि Note 14 भारतीय बाजारपेठेत लॉंच होतील. या मालिकेतील सर्व फोन 9 डिसेंबरला भारतात लॉंच होतील.

Realme 14x : Realme कंपनी सध्या भारतासाठी Realme 14x वर काम करत आहे. हा फोन डिसेंबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीनं याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाहीय. यात 6000 mAh बॅटरी आणि 50MP प्राथमिक कॅमेरा सेटअप असू शकतो. येत्या काही दिवसांत या फोनबद्दल अधिक तपशील उपलब्ध होतील.

Vivo X200 सीरीज : चीनमध्ये ऑक्टोबरमध्ये लॉंच झालेली Vivo X200 मालिका भारतात येण्यासाठी सज्ज झालीय आहे. कंपनी भारतीय बाजारात Vivo X200 आणि Pro प्रकार आणत आहे. या मालिकेतील दोन्ही फोन्समध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर मिळेल. प्रो मॉडेलमध्ये 90W चार्जिंगला सपोर्ट करणारी 6000 mAh बॅटरी असेल, तर बेस व्हेरिएंट 5800 mAh बॅटरीनं सुसज्ज असेल. जो 120W चार्जिंगला सपोर्ट करेल.

Realme Narzo 70 Curve : Realme आपल्या Narzo मालिकेत एक नवीन फोन आणत आहे. सध्या या फोनबद्दल फार काही अपडेट नाही, पण येत्या काही दिवसांत त्याच्या लॉंचबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

हे वाचलंत का :

  1. Redmi K80 सीरीज 27 नोव्हेंबरला होणार लॉंच, दमदार कॅमऱ्यासह जबरदस्त फीचर
  2. Vivo X200 मालिका लवकरच भारतात होणार लॉंच; Vivo नं 'X' वर दिली माहिती, काय असतील फीचर
  3. Honor 300 स्मार्टफोनचं डिझाइन, रंग पर्याय आले समोर, चार रंगात येणार फोन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.