ETV Bharat / state

विधानपरिषद निवडणूक 2024 : काँग्रेसची मतं फुटणार ही फक्त अफवा ; विजय वडेट्टीवार यांचा दावा - Maharashtra MLC Election 2024 - MAHARASHTRA MLC ELECTION 2024

Maharashtra MLC Election 2024 : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटणार असल्याची जोरदार चर्चा सध्या करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसची मतं फुटणार ही फक्त अफवा आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

Maharashtra MLC Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 1:04 PM IST

मुंबई Maharashtra MLC Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते विधानभवनात येण्यास सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान भवनात दाखल झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं फुटणार असल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेस पक्षाची मतं फुटणार आहेत, ही अफवा पसरवली जात आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Maharashtra MLC Election 2024
दिलीप वळसे पाटील (Reporter)

काँग्रेसची मतं फुटणार अशी अफवा पसरवल्या जातेय - विजय वडेट्टीवार : विधान परिषद मतदानला सुरुवात झाली असून सकाळपासून काँग्रेसचे उमेदवार महायुतीला मदत करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "आज मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आमदार फुटल्याचं काही वाहिन्या फेक नरेटिव्ह निर्माण करत आहेत. आमचे सर्व आमदार एकजूट आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांना हलवायची सुद्धा वेळ आली नाही. ज्यांना भीती आहे त्यांनी हॉटेलमध्ये त्यांना पळवलं. आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते. यामध्ये तिन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील. निवडणुकीत कुठंही गडबड होणार नाही."

कैलास गोरंट्याल यांच्याबाबत गैरसमज : काँग्रेस पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विधानावर वडेट्टीवार म्हणाले की "त्यांना काही गैरसमज झाला असेल, ते आमदार आमच्या सोबतच बैठकीला होते. सध्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं चित्र बदललेलं आहे. आम्ही 31 जागा जिंकल्या असून जनतेचा कौल कोणाच्या बाजूला आहे हे त्यांना कळतं. त्यामुळे सत्ताधारी भांबवल्यानं आशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. दोन आमदार सोडले तर सगळे 35 आमदार सोबत होते. अशोक चव्हाण गेल्यानंतर त्यांच्यासोबत ते होते, त्यामुळे गैरसमज झालेला आहे. क्रॉस मतदान झालं तर सत्ताधारी पार्टी सोबत होईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आम्ही एकनाथ शिंदेंसोबत - बच्चू कडू : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू म्हणाले की, "आम्ही आता दोन वर्षापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. मी आणि राजकुमार पटेल असे दोघंही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन मतदान करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांचं मला सांगता येणार नाही. आमची गॅरंटी देतोय, राजकुमार आणि बच्चू कडू यांचं मत एकनाथ शिंदेंना जाणार आहे. मला घोडेबाजाराच्या प्रॅक्टिस बाबत माहिती नाही. मी गोरगरिबांच्या डोक्यातला आवाज ऐकणारा माणूस आहे, आम्ही एवढं डोकं कधी चालवत नाही. एकनाथ शिंदेंचे दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि चांगला निकाल लागेल," असं विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

हॉटेलात ठेवणं काही सूचना देण्यासाठी - दिलीप वळसे पाटील : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री दिलीप वळसे पाटील हॉटेल पॉलिटिक्स संदर्भात बोलताना मत व्यक्त केलं. "आमदारांवर विश्वास आहेच, पण एकत्रीत काही सूचना द्यायच्या होत्या, म्हणून हॉटेलवर आमदार होते. महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील. त्या अनुषंगानं आम्ही सर्व आखणी केली आहे. तसेच यावेळी घोडेबाजार होईल असं वाटत नाही. सर प्लस मत मिळू शकतील, असा देखील विश्वास आहे. कोणत्या उमेदवाराची विकेट पडेल, याविषयी आपल्याला सांगता येणार नाही. मात्र महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील," असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. विधान परिषद निवडणूक 2024: आज कोणाची पडणार विकेट, कोण मारणार बाजी ? - Maharashtra Mlc Election 2024
  2. विधानपरिषदेत कोण मारणार बाजी, कोणाला बसणार धक्का? 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात! आज होणार फैसला - MLC ELECTION 2024
  3. कोठडीत असलेल्या गणपत गायकवाड यांना मतदान करण्यापासून रोखावं; काँग्रेसचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र - MLC ELECTION VOTING

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.