ETV Bharat / state

धबधब्यात वाहून गेलेल्या पाच पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले; दोन जणांचा अजूनही शोध सुरुच - Lonavala waterfall mishap - LONAVALA WATERFALL MISHAP

Lonavala waterfall : पुण्यातील लोणावळा परिसरातील भुशी धरणामागील धबधब्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बचावपथकाला सापडले आहेत. तर अद्याप दोघांचा शोध सुरू आहे.

Lonavala waterfall mishap
Lonavala waterfall mishap (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 12:52 PM IST

लोणावळा Lonavala waterfall mishap : पावसाळा सुरु होताच लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत असते. अनेक पर्यटक कुटुंबासोबत या ठिकाणी फिरायला जातात. लोणावळ्यामध्ये भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली. लियाकत अन्सारी व युनुस खान हे त्यांच्या 17 ते 18 कुटुंबातील सदस्यांसह धबधब्यावर पाण्याचा आनंद घेत होते. तेव्हा धबधब्यात असाताना पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्यानं त्यात दहाजण अडकले होते. त्यातील पाच जणांना बाहेर काढण्यात यश आलं. तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले अदनान अन्सारी आणि मारिया अन्सारी यांचा शिवदुर्ग मित्र मंडळ व आय.एन. शिवाजी यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. हा परिसर हा भारतीय रेल्वे विभाग आणि भारतीय वन खात्याच्या भागात येतो. त्यामुळे रेल्वे प्रशासन, वन विभाग आणि नगर पालिका यांच्या मदतीने उपाय योजना करण्यात येत आहेत.

पाच पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले (Source - ETV Bharat Reporter)

पोलीस आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन : लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहारा करीता येणा-या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाय, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईट खंडाळा, कुनैगाय, कुरवंडे या भागात वर्षाविहारा करीता येणारे पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले. लोणावळा आणि खंडाळा परिसरात वर्षाविहारा करीता येणाऱ्या पर्यटकांनी योग्य ती काळजी घेवून वर्षाविहाराचा आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये, असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा

  1. कंटेनर कुठून येतात-जातात हे वेळ आल्यावर सांगणार-एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Maharashtra politics
  2. नीट परीक्षा पेपरफुटीतील लातूरमधील आरोपींचा आज सीबीआय घेणार ताबा, मोठे मासे गळाला लागणार का? - Latur NEEt Exam Scam
  3. मुंबईत मंत्री नवाब मलिक यांचा विरोधात भाजपचे आंदोलन; फोटोवर जोडे चप्पलांचा केला मारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.