ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar : अवघ्या 27 व्या वर्षी लढवली होती लोकसभा निवडणूक; वाचा उच्चशिक्षित सुधीर मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द - Sudhir Mungantiwar Political Career

Sudhir Mungantiwar : वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढवणारे, तसंच उत्कृष्ट वक्ते असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे, यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

Political Career and Profile of Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 8:57 PM IST

चंद्रपूर Sudhir Mungantiwar : राज्यातील भाजपाच्या शीर्ष आणि ज्येष्ठ नेतृत्वामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होतो. गेल्या 40 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मुनगंटीवार यांना यावेळी चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वप्रथम सुधीर मुनगंटीवार यांनी वयाच्या 27 व्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती.

उच्च विद्याविभूषित मुनगंटीवार : सुधीर मुनगंटीवार हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून राजकारणात प्रसिद्ध आहे. आपलं म्हणणं मांडत असताना त्यांची आकडेवारी आणि संदर्भ अचूक असतात. यामागचं कारण त्यांनी घेतलेल्या अनेक पदव्यांमध्ये दडलेलं आहे. मुनगंटीवार यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेत एलएलबी पूर्ण केली. त्यानंतर एमफिल पूर्ण करुन त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण देखील घेतलं. सोबतच डीबीएम, पीआरआयपीएम असे अभ्यासक्रम देखील पूर्ण केले.

मुनगंटीवार यांचा राजकीय प्रवास : सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 साली झाला. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत झाली. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी म्हणजे 1979 मध्ये सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाच्या सचिवपदी त्यांची निवड करण्यात आली. एकाच वर्षात 1980 मध्ये ते या संघटनेच्या अध्यक्षपदी निवडले गेले. 1987 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद त्यांना बहाल करण्यात आलं. मुनगंटीवार यांना 1989 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीची उमेदवारी मिळाली. माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या विरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1991 मध्ये त्यांना पुन्हा जबाबदारी देण्यात आली. मात्र, यात ते पराभूत झाले. यानंतर शांताराम पोटदुखे हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले.

विदर्भातील सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आले : 1995 मध्ये मुनगंटीवार यांना विधानसभेची जबाबदारी देण्यात आली. मात्र, यावेळी मुनगंटीवार यांनी जोरदार पुनरागमन केलं. चंद्रपूरचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व माजी राज्यमंत्री श्याम वानखेडे यांना तब्बल 55 हजार मतांनी त्यांनी पराभूत केलं. विदर्भातील सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येण्याचा विक्रम मुनगंटीवार यांनी यावेळी केला. त्यानंतर 1999 मध्ये ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून पुन्हा निवडून आले. तर 2004 मध्ये त्यांनी विजयाची हॅट्रिक केली.

मतदारसंघ बदलत पुन्हा हॅट्रिक : 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं मुनगंटीवार यांनी बल्लारपूर-मूल विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं ते निवडून आले. या मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा ते निवडून आले.

1999 मध्ये मिळाले पहिले मंत्रिपद : पहिल्यांदा निवडून येताच मुनगंटीवारांना थोड्या काळासाठी का होईना मात्र मंत्रीपद देण्यात आले. 1 फेब्रुवारी 1999 मध्ये त्यांना मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात पर्यटन व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. पुढची विधानसभा निवडणूक लागेपर्यंत म्हणजे ऑक्टोबर 1999 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. यानंतर 2014 मध्ये ते अर्थ, वन आणि नियोजन खात्याचे मंत्री झाले. यानंतर 2022 मध्ये त्यांनी वनमंत्री तसंच मत्स्य आणि सांस्कृतिक मंत्रीपदाची शपथ घेतली.

अखेर बल्लारपूर तालुक्याला मंजुरी : पूर्वी बल्लारपूर तालुका नसल्यानं येथील नागरिकांना कुठल्याही कामांसाठी चंद्रपूर येथे यावं लागत होतं. दळणवळणाचे अत्यंत मर्यादित साधन असल्यानं आणि येथील बहुतेक नागरिक हे ग्रामीण भागात राहत असल्यानं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार करताना मुनगंटीवार यांनी निवडून आलो, तर कुठल्याही परिस्थितीत सर्वात आधी बल्लारपूर शहराला तालुक्याचा दर्जा मिळवून देईल, असं आश्वासन दिलं. मुनगंटीवार हे निवडून येताच त्यांनी या आश्वासनाचा सातत्यानं पाठपुरावा केला होता.

संघटनात्मक जबाबदारी : 1981 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांची भाजपाचे शहर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1987 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलं. 1993 मध्ये त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. 1996 मध्ये ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस झाले. 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 2010 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Election 2024 : 'सुधीर मुनगंटीवार यांना बळीचा बकरा केलं'; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
  2. सर्व दिव्यांग शाळांमध्ये ब्रेल लिपीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ उपलब्ध करणार-सुधीर मुनगंटीवार
  3. "लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक नाही, पण..."; सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.