हैदराबाद Lok Sabha Elections : निवडणूक आयोगानं आज (16 मार्च) 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. तारखांच्या घोषणेपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, 12 राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त असल्याची माहिती दिली. देशात 96.8 कोटी मतदार असून त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 49.7 कोटी, तर महिला मतदारांची संख्या 47.1 कोटी इतकी आहे.
महिला मतदारांची संख्या जास्त : पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, देशातील लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे 948 महिला असा आहे. 12 राज्ये अशी आहेत की, जिथं महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 85.3 लाख 18-19 वर्षे वयोगटातील महिला मतदार आहेत." तसंच यंदा 1.82 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली आहे.
चार राज्याच्या विधानसभा निवडणुका : लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही आज ठरवल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल दरम्यान मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्यात 26 एप्रिलला मतदान होईल. तिसऱ्या टप्याचं मतदान 7 मे रोजी, चौथ्या टप्याचं मतदान 13 मे रोजी, पाचव्या टप्याचं मतदान 20 मे रोजी, सहाव्या टप्याचं मतदान 25 मे रोजी आणि सातव्या टप्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तसंच निकाल 4 जून रोजी लागेल.
हेही वाचा -