ETV Bharat / state

निकालानंतर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांमध्ये चैतन्य; बुधवारी दिल्लीत बोलावली महत्त्वाची बैठक - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

Lok Sabha Election Results 2024 : देशभरात अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडणुकीचा निकाल समोर आला असून, जनतेनं खूप चांगल्या पद्धतीनं कौल दिला आहे. विशेषता उत्तर प्रदेशातील जनतेने दिलेला प्रतिसाद हा खूपच चांगला आहे. त्यामुळं इंडिया आघाडीला मिळालेल्या जागा पाहता उद्या सर्व पक्ष नेत्यांची दिल्लीत बैठक होईल आणि त्यात पुढील निर्णय घेतले जातील अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

Sharad Pawar
शरद पवार (ETV BHARAT HM DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 6:03 PM IST

मुंबई Lok Sabha Election Results 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खूपच उत्सुकता ताणली गेली होती. भारतीय जनता पक्ष अथवा एक्झिट पोलनी केलेल्या भाकित पेक्षा वेगळे निकाल जनतेने दिले आहेत. जनतेच्या मनात या सरकारी विषयी असलेला रोष आणि जाती धर्माच्या नावावर केले गेलेले मुद्दे हे जनतेला आवडले नाहीत. याचाच परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. त्यामुळं या निवडणुकीत खूप चांगल्या पद्धतीनं जनतेनं इंडिया आघाडीला प्रतिसाद दिला आहे. विशेषतः उत्तर प्रदेश सारख्या राज्यातही इंडिया आघाडीला मिळालेले यश हे वाखाणण्या जोगं आहे. अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना दिलेली टक्कर ही खूपच चांगली असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारणे असून खूप चांगल्या पद्धतीचा निकाल आम्हाला दिला आहे. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागा लढवल्या होत्या. त्यापैकी सात जागा निवडून आले आहेत. खूप चांगले यश आम्हाला जनतेने दिले आहे. महाविकास आघाडीलाही चांगल्या जागा आल्या आहेत. याचा अर्थ आता जनता तोडफोडीच्या राजकारणाला आणि जाती धर्माच्या राजकारणाला कंटाळली आहे हे स्पष्ट होतंय.

सिताराम येचुरी आणि खर्गे यांच्याशी चर्चा : केंद्रीय राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जागा पाहता या संदर्भात काय नेमकं करता येईल याबाबत इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. या बैठकीला आपण स्वतः हजर राहणार आहोत. या संदर्भात आपली सिताराम येचूरी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाली आहे. नितीश कुमार यांना उपपंतप्रधान पदाची ऑफर देणार का? याबद्दल विचारलं असता पवार म्हणाले की, अशी कुठलीही ऑफर कोणालाही अद्याप दिली गेलेली नाही किंवा त्याबाबत चर्चाही नाही, माझे कोणाशीही बोलणे झाले नाही. उद्या आम्ही या संदर्भात सर्वजण बैठक घेऊन निर्णय घेऊ. त्यानंतर काही गोष्टी ठरवता येतील असंही ते यावेळी म्हणाले.

परत घेण्याबाबत विचार करू : पक्षातून जे लोक बाहेर गेले त्यांना परत पक्षात घेणार का? याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. त्याबाबत आम्ही नाही गेलेल्या लोकांनी विचार करावा असंही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. जळगावच्या मतदारांची पुन्हा मोदींना साथ, स्मिता वाघ यांना निर्णायक विजयी आघाडी - Jalgaon Lok Sabha Results 2024
  2. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर; नारायण राणे, नितीन गडकरी आघाडीवर - Maharashtra lok Sabha election
  3. मशाल पेटली! भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव - Shirdi Lok Sabha Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.