ETV Bharat / state

वंचित'मध्ये राजकीय गणितं बिघडविण्याची ताकद, महाविकास आघाडीत येण्यास का होतोय विलंब? - Vanchit Bahujan Alliance

Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीशी युती नसल्यानं कोणीही बैठकीला उपस्थित राहू नये, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळं वंचितचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 11:09 AM IST

मुंबई Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील महाविकास आघाडी तसंच महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडं महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडी राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक पुण्यात होणार आहेत. या बैठकीत वंचित महाविकास आघाडीबरोबर असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर शरद पवार यांची भेट घेणार : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत महाविकास आघाडीची मंगळवारी पुण्यात बैठक होणार आहे. पुण्यातील बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीला वंचित तसंच महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जातील- विकास लवांडे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

असा असेल जागावाटपाचा फॉर्म्युला? : शिवसेनेबरोबर आधीच युती करणाऱ्या वंचितस बहुजन आघाडीनं जागावाटपासाठी 12-12च्या फॉर्म्युल्याची मागणी केली होती. मात्र, मविआच्या बैठकीपूर्वी सहा जागांची करण्यात आली होती. त्यामुळं वंचितला किती जागा मिळणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. 2019 च्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत राज्यात वंचिताला 7 टक्के मते मिळाली होती. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला होता. त्यामुळं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचं समोर येत आहे. काँग्रेसला 12 जागा, ठाकरे गटाला 18, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 10, वंचितला 5 ते 6 जागा, राजू शेट्टी यांना 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.

वेट अँड वॉच : 'आम्ही सध्या वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. त्यामुळं महाविकास आघाडी तसंच वंचितचं काय होते? ते पाहून नंतर निर्णय घेऊ'- गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

वंचितला धोका देतील : वंचित बहुजन आघाडी तसंच महाविकास आघाडी यांच्यातील युतीवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेलं आश्वासन पूर्ण करत नसल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळं वंचितालाही धोका मिळणार असल्याचा त्यांनी दावा केला.

वंचितमध्ये गणित बिघडविण्याची ताकद : राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड म्हणाले, "काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळं वंचितच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचं घटक पक्ष प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या मान्य करण्यास नकार देत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी विदर्भातील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राजकीय सौदेबाजी कशी करायची, हे प्रकाश आंबेडकरांना माहीत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची विजयी गणिते बिघडवण्याची वंचितमध्ये ताकद आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळं वंचित महाविकास आघाडीबरोबत जाऊन महायुतीला टक्कर देण्याची शक्यता आहे. तसं न झाल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातल कुणाची येणार सत्ता : महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र, यात महायुतीबरोबर असलेले काही घटक पक्ष नाराज आहेत. त्यात सदाभाऊ खोत, महादेव जानकर, बच्चू कडू यांचा समावेश आहे. तर दुसरीकडं वंचितला बरोबर घेण्यावरून महाविकास आघाडीकडून विलंब केला जात आहे. त्यामुळं कुणाची आघाडी आणि कुणाची बिघाडी होणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे वाचलंत का :

  1. महाविकास आघाडीकडून 'वंचित'साठी रेड कार्पेट; निवडणुकीसाठी 'वंचित'ची साथ लाखमोलाची ठरणार?
  2. महाविकास आघाडीत बैठकीचा ताळमेळ नाही, वंचित बहूजन आघाडी अनुपस्थित राहणार
  3. आधी विखे अन् आता चव्हाणही गेले; 'वंचित'ची वेगळीच व्यथा, पडला 'हा' मोठा प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.