ETV Bharat / state

मुंबईत लोकसभा मतमोजणीची तयारी पूर्ण, कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी - Lok Sabha Election Vote Counting - LOK SABHA ELECTION VOTE COUNTING

Lok Sabha Election Vote Counting : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली. या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील 48 मतदारसंघात मंगळवारी (4 जून) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय.

Lok Sabha Election 2024 vote counting preparation done
लोकसभा निवडणूक मतमोजणी (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 9:14 AM IST

मुंबई Lok Sabha Election Vote Counting : लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (4 जून) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय.

पत्रात काय म्हणालेत वडेट्टीवार? : विजय वडेट्टीवार आपल्या पत्रामध्ये म्हटले की, "जगातील सर्वात मोठी अनुकरणीय अशी लोकशाही असलेल्या भारतात सात टप्प्यात मतदान संपन्न झालं. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पाच टप्प्यातील मतदानाच्या काळात सामान्य मतदारांना मतदान केंद्रावरील अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. तर दुसरीकडं मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील प्रचंड असुविधांचा सामना करावा लागला होता. त्यामुळं मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात", अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव : पुढं ते म्हणाले की, "निवडणूक आयोगाकडून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा गाजावाजा केला गेला. राज्यातील बहुतेक भागात उष्णतेची लाट होती. तापमानाचा पारा 40 ते 47 डिग्री पर्यंत पोहोचल्याचं चित्र होतं. तरीदेखील मतदानासाठी मतदारराजा भर उन्हात रांगेत उभा होता. निवडणूक आयोगातर्फे पिण्याच्या पाण्याची सोय तसंच निवाऱ्यासाठी सावलीची व्यवस्था आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळं नागरिकांकडून निवडणूक आयोगाप्रती रोष व्यक्त केला गेला. वेळ लागत असल्यामुळं मतदान करणाऱ्यांनी मतदानाकडं पाठ फिरवल्याचे देखील बोललं जात होत. काही राज्यांमध्ये मतदारांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना उष्माघातामुळं आपले प्राण गमवावे लागले."

सुविधा उपलब्ध करून द्याव्यात-"देशातील लोकशाहीच्या महोत्सवाचा शेवटचा टप्पा अर्थात मतमोजणी मंगळवारी 4 जून रोजी होणार आहे. त्यामुळं बहुतेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून तापमानाचा पारा 45 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळं मतदान प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसंच मतमोजणी प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या व्यक्तींमध्ये उदासीनता आणि भितीचं वातावरण आहे. त्यामुळं मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांना निवडणूक आयोगानं अंतर्भुत केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सोयी सुविधा (पाणी, पंखे, कुलर, आरोग्य सुविधा इत्यादी) उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत", असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी मंगळवारी (4 जून) मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. तसंच शिवडी वेअर हाऊसमधील ‘30-मुंबई दक्षिण मध्य’ आणि ‘31-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी सुमारे 3500 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या कर्मचाऱ्यांसह उमेदवार, निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी, पोलीस उपस्थित राहणार असल्याचंही यादव यांनी सांगितलं. तसंच मतमोजणी होईल त्या ठिकाणी 4 ॲम्बुलन्स आणि वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहेत. केईएम हॉस्पिटलमध्ये 10 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकारी नेमण्यात आल्याचंही यादव म्हणाले.

हेही वाचा -

  1. मतमोजणीसाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट; मतमोजणी केंद्राचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा - Lok Sabha Elections 2024
  2. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवा; नागपूर खंडपीठात याचिका - Anil Rathod Pleads
  3. तळीरामांना दिलासा! लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच 'ड्राय डे' येणार संपुष्टात, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.