ETV Bharat / state

राज्यात अनेकांची नावं मतदार यादीतून गायब, निवडणूक आयोगानं आरटीआयमध्ये काय दिली आहेत कारणे? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आलाय. मतदानाच्या दिवशीच, मतदान कार्ड सोबत असूनही अनेकांना यादीत नाव नसल्यानं मतदान करता आलं नाही. मात्र, मतदार यादीत नाव नसल्यामागचं नेमकं कारण काय? यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊया.

Lok Sabha Election 2024 Names of many people missing from voter list in state know what is the reason behind that
मतदार यादीतून नाव गायब होण्यामागचं कारण काय? (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 8:09 AM IST

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच (Source- reporter)

पुणे Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीबाबत निकाल लागणार आहे. मात्र, पाचव्या टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया पाहिली तर अनेक मतदारसंघात कमी मतदान झालेलं पाहायला मिळालं. तर राज्यातील बहुतांश मतदारसंघात अनेक मतदारांचं मतदार यादीतून नावच गायब झाल्यानं मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. अशातच याबाबत सजग नागरिक मंचाच्या वतीनं माहिती अधिकारात माहिती घेतली असता 3 पद्धतीनुसार मतदारांची नाव वगळण्यात येत असते.

प्रत्येक निवडणुकीत नियमित मतदान करणाऱ्या मतदारांची नावं अचानक मतदान यादीतून गायब होण्याच्या हजारो घटना राज्यात घडल्यात. तर निवडणूक आयोग मतदारांनी याद्या चेक केल्या नाहीत असं म्हणून याची जबाबदारी झटकून मोकळे होते. म्हणून मतदार यादीतून एखाद्या मतदाराचं नाव कट करताना काय प्रक्रिया केली जाते याची माहिती अधिकारात निवडणूक आयोगाकडं मागितली असता याच्या उत्तरात निवडणूक आयोगानं तीन कारणं दिल्याचं, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितलं.

...यामुळं वगळली जातात मतदार यादीतून नावं : ते म्हणाले की, "दुसऱ्यांदा नावनोंदणी किंवा मतदारांचा पत्ता बदलणं किंवा मतदारांचा मृत्यू यापैकी कोणत्याही कारणानं मतदार यादीतून नाव वगळलं जाऊ शकतं. मात्र यापैकी कोणत्याही कारणानं नावं वगळताना फॉर्म 7 भरुन घेतलाच पाहिजे. मतदाराला नाव वगळण्यापूर्वी रजिस्टर पत्राने फॉर्मात-A प्रमाणे नोटीस दिलीच पाहिजे. या नोटीसनंतर यासंदर्भात आपलं म्हणणे मांडण्यासाठी मतदाराला 15 दिवसांची मुदत दिलीच पाहिजे. मतदारानं 15 दिवसांत प्रतिसाद दिला नाही, तर BLO ने मतदाराच्या पत्त्यावर स्वतः जाऊन खात्री करावी. त्यानंतरच BLO च्या रिपोर्टच्या आधारावर फाॅर्म 7 नसतानाही मतदाराचं नाव यादीतून वगळता येईल", अशी माहिती आयोगानं दिल्याचं वेलणकर म्हणाले.

मतदार यादीतून नाव गायब झालेल्यांनी काय करावं? : पुढं ते म्हणाले की, "निवडणुकीत वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या ज्या-ज्या मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली त्या प्रत्येक मतदारानं निवडणूक आयोगाला माहिती अधिकारात अर्ज करुन त्यांचं नाव ज्या फॉर्म 7 च्या आधारे वगळलं गेलंय. त्या फॉर्मची प्रत तसंच नाव वगळण्यापूर्वी दिली गेलेली फॉरमॅट A च्या नोटीशीची प्रत आणि नाव वगळण्यासंदर्भात BLO नं प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपास करावा. दिलेल्या रिपोर्टची प्रत या कागदपत्रांच्या प्रती मागाव्यात. तसंच यासाठीचा माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करावा. कारण जोपर्यंत सजग नागरिक लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगाला जाब विचारत नाहीत, तोपर्यंत मनमानी पद्धतीनं निवडणूक याद्यांमधून नावं वगळली जाण्याच्या घटनांना आळा बसणार नाही." तसंच पुढील काळात आम्ही याबाबत सविस्तर माहिती घेऊन आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. पालघरमध्ये मतदानादिवशी मतदारांचे हाल; लाखो लोकांची नावं मतदार यादीतून गायब, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप - Palghar Lok Sabha
  2. राज्यातील 48 मतदार संघात कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
  3. मतदानादिवशी मुंबईत दिवसभर काय-काय घडलं? निवडणूक आयोगानं दिली महत्त्वाची माहिती - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.