ETV Bharat / state

नेत्यांच्या चकरा अन् हेलिकॉप्टरच्या घिरट्यांमध्ये वाढ; निवडणुकीच्या काळात आलाय भाव, किंमती जाणून बसेल धक्का - Lok Sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची अनेकांची इच्छा असते. आकाशात हेलिकॉप्टर दिसलं तरी एखादा नेता, पुढारी किंवा मंत्रीच जात असेल, असा आपला समज असतो. मात्र, सध्या आकाशात घिरट्या घालणारे अनेक हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या हेलिकॉप्टरमधून सध्या तरी खरंच नेतेमंडळीच प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरला चांगलाच 'भाव' आलाय.

Lok Sabha election 2024
Lok Sabha election 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 9:23 PM IST

Updated : Apr 26, 2024, 10:56 PM IST

सुबोध जाधव यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरची मागणी वाढलीय. त्यामुळं राजकीय पक्षांना तब्बल 4 ते 5 लाख रुपये प्रतितास भाडं हेलिकॉप्टर कंपन्यांना मोजावं लागतंय. प्रचार सभेला जाण्यासाठी लागणारा वेळ वाचण्यासाठी हेलिकॉप्टरचा पर्याय हा 'बेस्ट' पर्याय आहे. तसंच हेलिकॉप्टरनं प्रचारासाठी गेल्यावर कार्यकर्त्यांसमोर नेत्याला 'छाप' टाकता येते. नेते हेलिकॉप्टरमधून उतरताच कार्यकर्त्यांनाही चांगलाच जोश येतो.

प्रचार जोरात : निवडणूक प्रचाराचा जोर वाढत चालला आहे. यात सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक एकाच दिवशी दोन पेक्षा अधिक सभांना हजेरी लावत आहेत. प्रवासात वेळ कमी लागावा याकरिता हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं निदर्शनास येत आहे. सध्या पुढील दीड महिना हेलिकॉप्टर आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळं तातडीनं आता उड्डाण होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. तर निवडणुकीच्या काळात जवळपास तीन टक्क्यांनी दर वाढल्याची माहिती एवियेशन कंपन्यांनी दिलीय.

दीड वर्ष आधीच हेलिकॉप्टर आरक्षित : निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा धडका सर्वत्र सुरू होतो. प्रचार सभाचं नियोजन आणि स्टार प्रचारक यांची यादी निश्चित केली जाते. मात्र, त्या अगोदरच जवळपास दीड वर्ष आधीच हेलिकॉप्टर विविध पक्षांकडून आरक्षित करण्यात येत असल्याची माहिती निर्विक एवियेशनचे संचालक सुबोध जाधव यांनी दिली. सध्या राज्यात 40 ते 50 हेलिकॉप्टर उड्डाण घेत आहेत. हेलिकॉप्टर एका दिवसात 4 ते 5 तासांचे उड्डाण करू शकतात. त्या पद्धतीनं नियोजन करून पक्षाचे नेते सभेला हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. या बाबतचं नियोजन दोन दिवस आधीच करावं लागतं, असं देखील एवियेशन कंपनीकडून सांगण्यात आलं.

निवडणुकीत उड्डाण तीस टक्क्यांनी महाग : दिग्गज नेत्यांकडून लवकरात लवकर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी नियोजन आखलं जातं. त्यात वेगानं प्रवास करण्यासाठी हेलिकॉप्टरचा पर्याय जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडतात. याच काळात उड्डाण घेण्याच्या दरात तीस टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. सध्या चार आसनी तसंच दहा आसनी हेलिकॉप्टर या दोन प्रकारच्या हेलिकॉप्टरची मागणी अधिक आहे. सध्या चार आसनी हेलिकॉप्टरचा दर 4 ते 5 लाख रुपये प्रतितास आहे. दहा आसनीसाठी 5 ते 6 लाख प्रतितास, असे दर आकारले जात आहेत. एप्रिल तसंच मे महिन्यासाठी राज्यातील सर्व हेलिकॉप्टर आरक्षित झाले आहेत. प्रत्येक राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांसाठी सर्वाधिक उड्डाण आरक्षित असल्याची माहिती निर्विक एवियेशन संचालक सुबोध जाधव यांनी दिली.

मुंबई-दिल्ली येथे विमानांची उपलब्धता अधिक : निवडणुकीत स्टार प्रचारक यांच्या जास्तीत जास्त सभांचं आयोजन केलं जातं. त्यात हेलिकॉप्टर तसंच विमानांचा वापर अधिक केला जात आहे. उड्डाण करण्यासाठी साधनांची उपलब्धता अधिक आहे. नियोजन असेल, तर एका दिवसात 600 ते 700 किलोमीटर उड्डाण हेलिकॉप्टर करू शकतात. त्याप्रमाणे राजकीय पक्ष सभांमधील नेत्यांच्या सहभागाचे नियोजन करतात. आधीच आरक्षित असल्यानं लगेच सुविधा देणं शक्य नसल्याचं व्यावसायिक मंदार भारदे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणूक 2024 मतदान : दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
  2. 'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा? सोशल मीडियावर रंगले 'वॉर' - Lok Sabha Election 2024
  3. 'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा? सोशल मीडियावर रंगले 'वॉर' - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 26, 2024, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.