ETV Bharat / state

विधानसभेची तयारी लोकसभेतून; भाजपाच्या नव्या फंड्यामुळं आमदार, नेत्यांची धावपळ - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

BJP Plan For Elections : लोकसभा निवडणुकीत महायुतीने विशेषत: भाजपाने 'मिशन 45 प्लस' अत्यंत गांभीर्यानं घेतल्याचं दिसतंय. त्यासाठी भाजपानं आपल्या आमदारांना विशेष टार्गेट दिलंय. जो आमदार लोकसभेच्या उमेदवाराला लीड देईल त्याला पुन्हा तिकीट देण्यात येईल, आणि ज्याच्या मतदारसंघात लीड कमी मिळेल त्याचं आमदारकीचं तिकीट धोक्यात येणार आहे. त्यामुळं लोकसभेच्या उमेदवाराशी मतभेद असले तरीही स्वतःच्या विधानसभेसाठी आमदारांना काम करावं लागणार आहे.

Lok Sabha Election 2024 BJP new policy plan give lead and get MLA ticket
विधानसभेची तयारी लोकसभेतून? भाजपाच्या नव्या फंड्यामुळं आमदार, नेत्यांची धावपळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 5:03 PM IST

शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे

मुंबई BJP Plan For Elections : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असताना दुसरीकडं भाजपा आमदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. विशेष करून महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन घटक पक्षांमुळं लोकसभा उमेदवार निश्चित करताना तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या नाकी नऊ आलं आहे. ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये म्हणून भाजपानं नवीन फंडा अवलंबला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून जास्त मताधिक्य मिळेल त्या आमदाराचं तिकीट विधानसभेसाठी नक्की केलं जाणार आहे. या कारणास्तव विद्यमान आमदार आणि आमदारकीसाठी इच्छुक नेते कामाला लागले आहेत.

ज्याचा लीड जास्त तो 1 नंबर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये फूट पाडत शिवसेनेचे दोन गट तयार केले. तर दुसरीकडं अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत राष्ट्रवादीचे दोन गट तयार केले. अशात सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. याच कारणास्तव महायुतीत लोकसभा जागा वाटपात असंख्य अडसर निर्माण झाले. अनेक विद्यमान खासदारांचे पत्ते कापले गेले तर नवख्या पक्षांतर केलेल्या नेत्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. ही परिस्थिती सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्भवू नये याकरता भाजपानं नवीन फंडा अवलंबला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला चांगला लीड मिळेल त्या मतदारसंघातील आमदारालाच पुन्हा उमेदवारी देण्याचं निश्चित झालय. परंतु ज्या विधानसभा मतदारसंघात लीड मिळणार नाही, तेथील नेत्याची किंवा आमदाराची आमदारकी ही धोक्यात येणार आहे. भाजपानं यंदा लोकसभेसाठी अबकी बार महाराष्ट्रात 45 पारचा नारा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपाने अवलंबलेला हा फंडा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सुद्धा आहे लागू राहणार आहे. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळं संपूर्ण चित्र बदललं आहे. अनेक निष्ठावंत नेत्यांना, आमदार, खासदारांना निवडणुकीत विजयासाठी धोका जाणवू लागलाय. परंतु भाजपाच्या या नवीन फंड्यामुळं महायुती मधील नेते, आमदार आपल्या मतदार संघातील उमेदवाराला जास्त मताधिक्यानं जिंकून आणण्यासाठी जोरात कामाला लागले आहेत. यामध्ये कोण किती मताधिक्याने उमेदवाराला निवडून आणून सर्वात जास्त लीड देतो हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

उमेदवार आवडीचा असो किंवा नसो मात्र विजयी करणं महत्त्वाचं : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करण्यासाठी नव नवीन फंडे नेत्यांकडून अवलंबले जात आहेत. विशेष म्हणजे जागा वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी दूर करायला बराच वेळ गेला आहे. आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड घेण्यासाठी नेते आमदार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये नेते आणि आमदारांनी दाखवलेले त्यांचे रिपोर्ट कार्डच त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी तारणहार ठरणार आहे. म्हणूनच लोकसभा उमेदवार निवडताना अनेक विधानसभा आमदारांनी ठराविक उमेदवारावरच जास्त आग्रह धरला. यात बऱ्याच ठिकाणी आमदारांना यश आलं असलं तरी सुद्धा अनेक ठिकाणी त्यांना नाराजीचा सामना ही करावा लागला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जो उमेदवार आहे. तो त्यांचा आवडता असो की नावडता, परंतु महायुतीत त्याला आपल्या विधानसभा मतदारसंघातून जास्त मताधिक्याने निवडून आणणे हे त्या मतदारसंघातील आमदाराचं व त्याचबरोबर नेत्याचं प्रमुख कर्तव्य असणार आहे.

याबाबत बोलताना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे म्हणाले की, लोकसभेचा उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा नसून तो महायुतीचा असणार आहे. त्या कारणानं त्या उमेदवाराच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघातून त्या उमेदवाराला जास्त लीड मिळेल नक्कीच ते आमदार, नेत्याचा विचार विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रामुख्यानं केला जाणार. कारण आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड देऊन लोकसभा उमेदवारास विजयी करणे हे त्या त्या विधानसभा मतदारसंघातील नेते आणि आमदारांचं कर्तव्य असणार आहे.

"जिसकी लाठी, उसकी भैस" : मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला 227 जागांवर सर्वात जास्त मताधिक्य होतं. भाजपानं लोकसभेत 23 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेना 18 जागांवर विजयी झाली होती. लोकसभे पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 105 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. अशाप्रकारे युतीनं 161 जागांवर विजय मिळवला होता. तर 2019 लोकसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 22 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचे 45 उमेदवार विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या, आणि 23 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 53 जागा जिंकल्या होत्या. अशाप्रकारे लोकसभा निवडणुकीत जरी बऱ्याच मतदारसंघांमध्ये मताधिक्य कमी असलं तरीसुद्धा विधानसभेत बाजी मारण्यामध्ये अनेक ठिकाणी पक्ष सरस ठरले आहेत. परंतु सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात "जिसकी लाठी, उसकी भैस" याप्रमाणे ज्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभा उमेदवाराला जास्तीत जास्त लीड मिळेल त्या नेत्याला किंवा आमदाराला 2024 विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर दावेदारी नक्की करता येणार आहे. या कारणानं आता महायुतीचे जवळपास सर्वच नेते आणि आमदार आपल्या मतदारसंघातील लोकसभा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करत असल्याचं पाहायला मिळतंय.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, महायुतीच्या उमेदवाराचा करणार प्रचार - Lok Sabha election 2024
  2. बापरे! मतदान केंद्रात निघाला विषारी साप, मतदार गोंधळले - Lok Sabha Election 2024
  3. निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम! विशिष्ट थीमवर तयार केले मतदान केंद्र, पाहा व्हिडिओ - Theme Voting Center

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.