ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2024 :अमरावती लोकसभा मतदार संघात 'वंचित'कडून सुजात आंबेडकरांची चर्चा - Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा निवडणूक 2024 साठी वंचित आघाडीच्या सुजात आंबेडकरांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सुजात आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढावी, यासाठी ठराव पास केला आहे.

Lok Sabha 2024
सुजात आंबेडकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 12:14 PM IST

अमरावती Lok Sabha 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर युती व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून सुजात आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढावी, यासाठी बहुजन विकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठराव पारित केला आहे. बहुजन वंचित आघाडीमधील या घडामोडींचा अंदाज घेता सुजात आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावतीत झाली होती लोकशाही गौरव सभा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 20 जानेवारीला अमरावतीच्या सायन्स कोर मैदान इथं लोकशाही गौरव सभा घेऊन भाजपासह काँग्रेसवर देखील टीका केली होती. वंचित बहुजन आघाडीची राज्यात सर्व 48 जागा लढण्याची तयारी असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवायचं असेल, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र बसून काम करण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडी भाजपाला टक्कर देऊ शकत नाही," असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

आनंदराव आंबेडकरांच्या नावाचीही चर्चा : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराव आंबेडकर हे देखील अमरावती लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. जर सुजात आंबेडकर यांच्यासोबत आनंदराव आंबेडकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरले तर अमरावती लोकसभा मतदारसंघात आंबेडकर विरुद्ध आंबेडकर अशी लढत होताना दिसेल. आंबेडकरांमधील ही आपसातील लढत नवनीत राणा यांच्यासाठी किती फायद्याची राहील, याबाबत देखील मतदार संघात आता चर्चा व्हायला लागली आहे.

काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा : अमरावती लोकसभा मतदार संघ हा महायुतीनं काँग्रेससाठी सोडला आहे. काँग्रेसकडून अद्याप देखील उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील, असं दोन वर्षांपासून बोललं जात असलं, तरी काँग्रेसनं अद्यापही बळवंत वानखडे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली नाही. एका वृत्तपत्र समूहाच्या संपादकांचाही संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेस विचार करत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

  1. 'लेखी प्रतिज्ञापत्र देऊन अनेकजण पळून गेले' : विनायक राऊतांचा प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल
  2. लोकसभा निवडणूक 2024 : महाआघाडीचा तिढा सुटेना, काय आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा माईंड गेम ?
  3. वंचित'मध्ये राजकीय गणितं बिघडविण्याची ताकद, महाविकास आघाडीत येण्यास का होतोय विलंब?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.