ETV Bharat / state

'पाणी वाचवा झाडे वाचवा' संदेश देत तरुणाची भारतभ्रमंती; आत्तापर्यंत 14 हजार किलोमीटरचा 'सायकल प्रवास' - Kolhapur News - KOLHAPUR NEWS

Kolhapur News : पर्यावरण जनजागृती करण्यासाठी 'पाणी वाचवा झाडे वाचवा' असा संदेश देत आसाम येथील तरुण भारत भ्रमंतीला निघाला आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी त्यानं प्रवास सुरु केला असून आतापर्यंत १२ राज्यात त्यांनी हा संदेश पोहवला आहे. देशभर हा संदेश पोहोचवणार असा त्यांचा संकल्प आहे.

Litton Naamchindra
लिटन नामछिद्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 11:48 AM IST

कोल्हापूर Kolhapur News: पर्यावरणाच्या रक्षणासाठी 'पाणी वाचवा झाडे वाचवा' असा संदेश देत आसाममधील 28 वर्षीय तरुणानं 12 राज्यातून आतापर्यंत 14 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. नुकताच तो कोल्हापुरात दाखल झाला. कोल्हापुरातून गुजरात, राजस्थान मार्गे काश्मीरपर्यंत प्रवास करुन देशभर हा संदेश पोहोचवणार असल्याचा संकल्प त्यानं केला आहे. लिटन नामछिद्र असं तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे मोल-मजूरी करुन त्यांनी पैसे जमवले आणि भ्रमंतीसाठी निघाला आहे.

लिटन नामछिद्र (ETV Bharat Reporter)

2 नोव्हेंबर 2023 पासून प्रवासाला सुरुवात: आसाम राज्यातील कासार या छोट्याशा गावातून 2 नोव्हेंबर 2023 या दिवशी लिटन नामछिद्र यांनी आपल्या भारत भ्रमंतीला सुरुवात केली. आपल्या सायकलवर सशक्त भारतासाठी 'पाणी वाचवा झाडे वाचवा' असा संदेश घेऊन सिक्कीम, झारखंड बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक असा प्रवास करत लिटन नामछिद्र शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. कोल्हापुरातून तो पुढच्या प्रवासासाठी रवाना झाला असून गुजरात, राजस्थान मार्गे काश्मीरपर्यंत आणखी 12 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करुन पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन जाणार असल्यास त्यांनी 'ईटीव्ही भारत' बोलताना सांगितले.

वृक्ष कधीही धोका देणार नाहीत: गेल्या दहा वर्षात जे पर्यावरण होतं, ते आता नाही. ते पुढच्या दहा वर्षात असंच असेल, हेही सांगता येत नाही. तुमचा मुलगा किंवा माझा मुलगा धोका देवू शकतो. परंतु झाडे कधीही धोका देत नाहीत, त्यामुळेच मी त्यांना प्राणपणानं जपतो. आसाममधील अनेक शाळांमध्ये मी वृक्षारोपण केलं आहे. आतापर्यंत 800 झाड लावली असून माझी आई, वडील, बहीण त्या झाडांना आता जपत आहेत. मी ही मोहीम घेऊन भारतभ्रमंती करत असून आता कश्मीरमधील लडाखपर्यंत हा संदेश घेऊन जाणार असल्याचं लिटल नामछिद्र यांनी सांगितलं.

मजुरी करुन जमवले पैसे : लिटन नामछिद्र यांच्या कुटुंबातच पर्यावरणाची आवड असल्यानं लहानपणापासूनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी ते काम करत आहेत. पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन भारतभर भ्रमंती करण्यासाठी त्यांनी मजुरी करुन पैसे जमवले, दैनंदिन गरजासाठी लागणाऱ्या वस्तू घेवून ते निघाले आहेत. रस्त्यावर जेवण बनवून ते पुढच्या प्रवासाला निघतात. असाममधील अनेकांनी त्यांना या मोहिमेसाठी मदतीचा हात दिला आहे.

हेही वाचा

  1. पर्यावरण रक्षणासाठी निघालेल्या तिघांचं कोल्हापूरात स्वागत, 11 राज्यांतून केला 11 हजार किमी सायकल प्रवास - Travel for environmental protection
  2. Cycle Girl On Tour: महिला सुरक्षिततेसाठी तरुणीची देशभरात सायकल भ्रमंती, २० हजार किमी पूर्ण करणार अंतर
  3. Cycling From Kashmir To Kanyakumari: गांधी विचारांचा जागर करण्यासाठी 'या' अवलियाचा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा सायकल प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.