मुंबई list of BJP star campaigners : भाजपाच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरदार तयारी केली आहे. भाजपानं मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील भाजपाच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्याकडं प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रत्येक राज्यात 40 स्टार प्रचारक : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं चार राज्यांच्या स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आहे. मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजपानं 40-40 दिग्गज नेत्यांची नावं स्टार प्रचारक म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र राज्यातील यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, यांच्यासह अशोक चव्हाण यांचाही समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील स्टार प्रचारक : भाजपानं महाराष्ट्रासाठी घोषित केलेल्या 40 स्टार प्रचारकांमध्ये केंद्रातील जवळपास सर्वच नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, रामदास आठवले या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या मुख्यमंत्र्यांचासुद्धा महाराष्ट्राच्या यादीमध्ये समावेश आहे.
अशोक चव्हाण भाजपाचे स्टार प्रचारक : महाराष्ट्रातील प्रमुख स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, तसंच मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे या मंत्र्यांचा समावेश आहे. यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसुद्धा भाजपाचे स्टार प्रचारक असणार आहेत.
राज ठाकरेंबाबत अद्याप संभ्रम : विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीत राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याच्या प्रयत्नात असून अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील दिवसात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सामील होणार या चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत अद्याप चर्चा, बैठकांच सत्र सुरू असून राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यास राज्यातील प्रमुख प्रचाराकांच्या यादीत राज ठाकरे एक नंबरचे नेते ठरतील यात शंका नाही.
हे वचालंत का :
- महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news
- प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार? - Manoj Jarange Patil
- ईडीच्या नोटीससह लोकसभेची उमेदवारी एकाच दिवशी, ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांच्या घरी तपास संस्थांकडून झाडाझडती - Amol Kirtikar