ठाणे- एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने शिळफाटा येथे जप्त केला असून, कंटेनर चालकाला अटक करण्यात आलीय. कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडीकडे जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी व्हिस्की आणि रम आणि बिअरचे 110 बॉक्स, असा सुमारे 55 लाख 79 हजारांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक वैभव वैद्य यांनी दिलीय.
मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर : मद्याने भरलेल्या या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चालकावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्रे जप्त केलीत. दरम्यान, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरीत्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपअधीक्षक वैद्य यांनी दिलाय.
तस्करीसाठी अनोखी युक्ती : मद्य तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती करीत असतात. वाहनांच्या आता दुचाकीच्या डिक्कीमध्ये ट्रक अन् टेम्पोच्या तळात आणि चक्क दुधाच्या टाकीतून देखील मद्य तस्करी होत असते. नव वर्षाची तयारी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागदेखील सतर्क झालंय आणि त्यांनी ही युक्ती उघड करत कारवाई सुरू केलीय.
हेही वाचा -