ETV Bharat / state

मादी बिबट्यानं पडक्या गोठ्यात दिला तीन पिल्लांना जन्म; काही दिवसांपूर्वी मादी बिबट्यानं माजवली होती दहशत - Leopard Gives Birth Three Cubs - LEOPARD GIVES BIRTH THREE CUBS

Leopard Gives Birth Three Cubs : नागभीड तालुक्यातील बाळापूर येथील पडक्या गोठ्यात एका मादी बिपट्यानं तीन पिलांना जन्म दिलाय. यामुळं गावात दहशतीचे वातावरण पसरलं आहे.

Leopard Gives Birth Three Cubs
बिबट मादीनं पडक्या गोठ्यात दिला तीन पिलांना जन्म (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 8:39 AM IST

Updated : Aug 6, 2024, 12:42 PM IST

चंद्रपूर Leopard Gives Birth Three Cubs : नागभीड तालुक्यातील बाळापूर (खुर्द) इंथ डिमदेव सेलोटे यांच्या पडक्या गोठ्यात एका बिबट मादीनं तीन पिलांना जन्म दिलाय. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या गावात अनेकदा या बिबट्या मादीनं हैदोस घातला होता. रात्रीच्या वेळी अनेकांच्या लहान गायी, बकऱ्या, आणि लहान वासरावर हल्ला करून त्यांना ठार मारलं होतं. यामुळं गावात दहशतीचं वातावरण पसरलं होतं.

अशी मिळाली माहिती: गावातील लोकेश ठवरे, काशिनाथ तरोने,दिलीप सोनकर, शंकर वाटकर यांची जनावरं या मादी बिपट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. वेळोवेळी गावचे सरपंच कमलाकर ठवरे यांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. सोमवारी सकाळी गावातील एका व्यक्तीनं डिमदेव सलोटे यांच्या पडक्या गोठ्यातून बिबट्याला बाहेर पडताना पाहिलं. भयभीत होवून त्यानं ही माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिलं असता बिबट्याची तीन पिल्लं आढळून आली. विशेष बाब म्हणजे इथून काही अंतरावरच जिल्हा परिषदेची शाळा आहे. याची माहिती सरपंच कमलाकर ठवरे यांनी वनविभागाला दिली. बिबट मादी पुन्हा त्या ठिकाणी येऊन आपल्या पिल्लांना घेऊन जाणार असल्यानं वनविभागाकडून कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे. यामुळं गावात एकाच वेळी उत्सुकता आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बिबट मादीचे पिल्लू हे पाच ते सहा दिवसाचे आहेत आणि ते सुखरूप आहेत. ज्या ठिकाणी पिलांना जन्म दिला त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे. अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी दिली.

गावातील एका व्यक्तीला बिबट्या दिसताच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. गावातील अनेकांची जनावरे या बिबट्याने मारली असून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी वनविभागाने लवकरात लवकर या श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा

  1. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचं पहिलं दर्शन, मध्य भारतातील पहिली घटना - leopard cat
  2. मोहाडी गावात बिबट्याचा थरार; सहा जणांवर केला हल्ला, गावात तणाव - Leopard caged in Chandrapur

Last Updated : Aug 6, 2024, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.