ETV Bharat / state

सीबीआय नीट पेपर फुटीतील मुख्य सूत्रधार इरान्ना कोंगुलवारच्या घराची घेणार झडती; हाती लागणार मोठं घबाड? - Latur NEEt Exam Scam - LATUR NEET EXAM SCAM

NEET Paper Leak Case : नीट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार इरान्ना मष्णाजी कोंगुलवार हा परिवारासह फरार आहे. लातूर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. आता सीबीआयचे अधिकारी आरोपी इरान्नाच्या घराची झडती घेणार आहेत.

NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Case (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 11:49 AM IST

लातूर NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटी प्रकरणाचा लातूरतील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा वर्ग होताच मागील दोन दिवसापासून लातूरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील आरोपी आणि कागदपत्रांचा ताबा मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानं सीबीआयची ही विनंती सोमवारी मान्य केली आहे. सीबीआयचे तपास अधिकारी अटकेतील आरोपी संजय जाधव व जलील पठाण या दोघांना आज (2जुलै) लातूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत. सीबीआयचे अधिकारी आरोपी इरान्ना कोंगुलवार याच्या लातूरातील घराची झडती घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीहून लातूरमध्ये आलेले सीबीआयचे अधिकारी शनिवारी मध्यरात्री लातूरमध्ये दाखल झाले. लातूरत दोन दिवस ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकानं नीट पेपर फुटी प्रकरणातील सुरू असलेल्या घटनाक्रमाची सखोल माहिती लातूर पोलिसांकडून घेतली. लातूरचे आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांना ताब्यात घेणं किती महत्त्वाचं आहे, हे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं आहे. सीबीआयच्या वतीनं विशेष सरकारी वकील मंगेश महिंद्रकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांची पोलीस कोठडी आज (2 जुलै) संपत असल्यानं त्यांना सीबीआयचे अधिकारी आज त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत.

आरोपींना दिल्लीला नेणार का?सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांचा ताब्यात घेण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी यांची परवानगी मिळाली आहे. असे असले तरी सीबीआयला मंगळवारी (2 जुलै) अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर वरिष्ठ न्यायालयाकडून रीतसर ताबा घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आज अधिकारी अटकेतील आरोपींसह लातूरच्या न्यायालयात हजर होणार आहेत. त्यामुळं आज (2 जुलै) आरोपींचा न्यायालयातून ताबा घेतल्यानंतर सीबीआयचे अधिकारी आरोपींना दिल्लीला घेऊन जाणार का? की पोलीस कोठडीत वाढ करून लातूरमधेच सखोल चौकशी करतात? हे आज स्पष्ट होणार आहे. आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक झाल्यापासून त्यांचे नातेवाईक अद्याप न्यायालयाकडे फिरकले नाहीत. आरोपींचे वकील जामिनासाठी न्यायालयाकडे मागणी करतात का? हे आज स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

  1. लातूरच्या 'नीट' घोटाळ्याचा तपास सीबीआयकडं वर्ग, दोन आरोपी अजूनही फरार, कसून शोध सुरू - NEET Exam Scam
  2. अपक्ष उमदेवारानं बिघडविलं गणित, नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय - MLC Polls 2024
  3. पदवीधर निवडणूक 2024 : मुंबई पदवीधर मतदारसंघातून उबाठा गटाचे अनिल परब विजयी, किरण शेलारांचा केला पराभव - Maharashtra MLC Polls

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.