ETV Bharat / state

कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 6:53 PM IST

Krishna Janmashtami 2024 : नाशिकच्या कापड बाजार परिसरात पुरातन श्री मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सुरू आहे. दहा दिवसांच्या उत्सव काळात मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाची विविध रूपं साकारली जातात. त्यामुळं इथं भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते.

Krishna Janmashtami 2024 Darshan of various forms of Lord Krishna at 200 year old Murlidhar Temple of Nashik
मुरलीधर मंदिर नाशिक (ETV Bharat Reporter)

नाशिक Krishna Janmashtami 2024 : नाशिक शहरातील जुने नाशिक भागात असलेल्या कापड बाजार परिसरात 200 वर्ष पुरातन श्री मुरलीधर मंदिर आहे. या मंदिरात सध्या श्री कृष्ण जन्मोत्सव सुरू आहे. दहा दिवसांच्या या उत्सवकाळात मंदिरात श्री मुरलीधराची विविध रूपं साकारली जातात. तसंच यादरम्यान मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडतात.

नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रूपांचं दर्शन (ETV Bharat Reporter)

मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रूपांचं दर्शन : नाशिक शहराची धार्मिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे. इथं लहान, मोठी अशी दोन हजाराहून अधिक मंदिरं आहेत. यातील बहुतांश पुरातन मंदिरं आहेत. यातीलच एक मंदिर म्हणजे नाशिकच्या कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिर. 200 वर्ष जुन्या या मंदिरात अखंड पाषाणातील साडेतीन फुटाची श्री कृष्णाची मूर्ती आहे. 1826 साली गुंडराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. आज त्यांची 14 वी पिढी या मंदिराचं व्यवस्थापन बघत आहे. दरवर्षी श्री कृष्ण जन्मोत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. या दरम्यान श्री मुरलीधराची विविध रूपं साकारली जातात. यात झुल्यावर विराजमान कृष्ण, शेषनाग, मोर, मोहिनी, अर्धनारीनटेश्वर, झुल्यावर कृष्ण रूप, गरुडावर विराजमान कृष्ण, रथावर विराजमान कृष्ण, घोंगडीवाला कृष्ण अशा विविध प्रकारची रूपं साकारली जातात. कृष्णाची ही विविध रूपं बघण्यासाठी भाविक या मंदिरात गर्दी करत असतात.

अशीही मान्यता : श्री मुरलीधर मंदिरात मागितलेली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसंच ज्यांचं लग्न जमत नाही, वंशवृद्धी होत नाही, अशांना मंदिरातून श्रीकृष्णाची मूर्ती दिली जाते. त्यानंतर या मूर्तीची मनोभावे पूजा केल्यानंतर मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हेही वाचा -

  1. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनं दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पाहा पोस्ट - krishna janmashtami

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.