ETV Bharat / state

कोयना धरणातील पाण्यानं गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद - Koyna Dam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 10:40 PM IST

Koyna Dam water level decreased : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळं जुन्या गावठाणांसह सुमारे 200 वर्षापूर्वीच्या मंदिरांचे अवशेष उघडे पडले आहेत. पाण्याअभावी बोटींग सेवा बंद पडली असून शिवसागर जलाशयाचं भेगाळलेलं पात्र सध्या दृष्टीस पडत आहे.

Koyna Dam
कोयना धरण (ETV BHARAT Reporter)

सातारा Koyna Dam water level decreased : सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळं लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्यानं धरणांतर्गत गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कोयना धरणातील पाण्यानं गाठला तळ (ETV BHARAT Reporter)

शिवसागर जलाशयातील बोटींग सेवा बंद : कोयना धरणाच्या निर्मितीपासून शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची घट होण्याची यंदाची सहावी वेळ आहे. बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडल्यामुळं भेगाळलेल्या पात्रात बोटी विसावल्या आहेत. बोट व्यवसाय बंद असल्यानं पर्यटकांनी देखील पाठ फिरवली आहे. परिणामी, बोटींग व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोयनेचा जलाशय पडला कोरडा ठाक : महाबळेश्वर ते कोयनानगर दरम्यान 92 कि. मी. लांबीचा शिवसागर जलाशय (बॅक वॉटर) आहे. यंदा मान्सूनच्या पावसाला अजुनही सुरूवात झालेली नाही. त्यामुळं धरणातील पाणी पातळी कमालीची घटली आहे. बॅक वॉटरचा परिसर उघडा पडला आहे. कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यातील 107 गावांसाठी असणाऱ्या शासकीय आणि खासगी बोटी बंद आहेत. त्यामुळं भेगाळलेल्या पात्रातून, दलदलीतून वाट काढत नागरिक बाजारपेठ गाठत आहेत.

बुडीत गावांचे अवशेष पडले उघड्यावर : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांचे अवशेष सध्या उघडे पडले आहेत. प्राचीन मंदिरे, गावठाणे पाहायला मिळत आहेत. पुनर्वसित झालेले धरणग्रस्त नागरीक आपल्या मूळ गावांचे अवशेष पाहण्यासाठी पायपीट करत शिवसागर जलाशयाकडं येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

हे वाचलंत का :

  1. सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळायची घाई, तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी - Monsoon Session Period
  2. इचलकरंजी महानगरपालिकेत दोन आयुक्तात रंगला 'खुर्चीवाद', दोघांनीही थाटल्या एकाच दालनात खुर्च्या - Ichalkaranji Commissioner Dispute
  3. विधानपरिषद निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाचा शिवसेनेवर दबाव? - Legislative Council Elections

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.