ETV Bharat / state

कोल्हापुरात भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकींना उडविले, चौघांचा मृत्यू - Kolhapur Accident News

Kolhapur Accident News : शहरातील सायबर चौकात (Cyber Chowk) एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारने चौघांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा मुत्यू झाला आहे.

Kolhapur Accident News
कोल्हापूरात भीषण अपघात (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 10:48 PM IST

कोल्हापूर Kolhapur Accident News : सतत वाहतुकीच्या वर्दळीने गजबजलेल्या शिवाजी विद्यापीठ परिसरात सायबर चौकात (Cyber Chowk) एका भरधाव कारने दुचाकीवरील ६ जणांना उडवल्याची थरकाप उडवणारी घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार लोक ठार झाले, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कोल्हापूरात भरधाव कारने दुचाकींना उडविले (ETV BHARAT Reporter)

असा घडला अपघात : शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ.व्हि.एम.चव्हाण (७४,रा. वैभव हौ.सोसायटी,शाहू टोल नाका कोल्हापूर) हे त्यांच्या चारचाकी गाडीतून शिवाजी विद्यापीठ मार्गावरुन सायबर चौकातून जात असताना, दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं गाडी अनियंत्रित झाली. त्यात ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर त्यांचा पाय पडल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या अनियंत्रित चार चाकी गाडीने चौकातील दुचाकींना अक्षरशः चिरडले, ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेजण हवेत १० ते १२ फूट उडाले. दुचाकींना २० फूट फरपटत नेऊन सिग्नलच्या खांबाला धडकून चार चाकी गाडी पलटी झाली.

चौघांचा मृत्यू : यावेळी आसपासच्या नागरिकांनी तातडीनं धाव घेत, जखमींना रुग्णालयात दाखल केलं. गाडी चालक वसंत चव्हाण यांचा उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात काही क्षणातच मृत्यू झाला. तर या अपघातात हर्षल सचिन पाटील (१६), प्रदीप पाटील (२४,दोघेही रा.दौलतनगर आणि अनिकेत चौगुले रा.पोर्लै तर्फे ठाणे, ता.करवीर) या चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघातातील पाच जखमींवर सीपीआर रुग्णालयासह एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये जयराम संतोष पाटील (रा.असळज ता. गगनबावडा ), प्रथमेश सचिन पाटील रा. दौलतनगर, धनाजी शंकर कोळी, शुभांगी धनाजी कोळी, समर्थ शंकर पाटील (सर्व रा.कणेरीवाडी, ता.करवीर) यांच्यावर सायबर चौकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर मोठा अनर्थ घडला असता : सायबर चौक हा नेहमीच वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. शिवाजी विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्था या परिसरात आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. अपघाताच्या काही क्षणापुर्वीच ज्वालाग्राही टॅंकर या चौकात वळून जाताना दिसतो. त्यामुळं मोठा अनर्थ टळल्याचं दिसून आला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या अपघाताची दाहकता पाहून कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर पोलीस उपधीक्षक अजित टिके यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा -

  1. मुंबईत एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात, तिघांचा मृत्यू - Mumbai Accident News
  2. कल्याणीनगर अपघातात प्रकरणात आरोपीला अटक, सोसायट्यांमधून बार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप - Pune accident news
  3. जेवणासाठी बस ढाब्यावर थांबविली अन् घात झाला... ११ यात्रेकरुंचा बस अपघातात मृत्यू - Shahjahanpur accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.