ETV Bharat / state

लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर; तर किरण शेलारांना जिंकण्याचा विश्वास - Graduate Constituency Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 1:09 PM IST

Updated : Jun 26, 2024, 2:39 PM IST

Graduate Constituency Election 2024 : मुंबई मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मतदान केलं. यावेळी त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवण्याचं आवाहन नागरिकांना केलं. तर महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

Graduate Constituency Election 2024
संपादित छायाचित्र (Reporter)

लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर (Reporter)

मुंबई Graduate Constituency Election 2024 : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 साठी आज मतदान होत आहे. या मतदार संघात भाजपा, महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांची लढत उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांच्यासोबत होत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मुंबईतील पराभवानंतर ही निवडणूक महायुतीसाठी फार महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघातून आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास किरण शेलार यांनी व्यक्त केला आहे. तर वर्षानुवर्ष आमचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आमचाच विजय होईल, असा ठाम विश्वास उबाठा गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत मतदान केल्यानंतर या दोघांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजय माझाच आहे, किरण शेलारांना विश्वास : मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 साठी आज मतदान होत असून मुंबईतील वरळी इथल्या मतदान केंद्रावर भाजपा, महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदान केलं. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरण शेलार म्हणाले की, "मी मतदानाचा हक्क बजावला आहे. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार मतदान करत आहेत. मागच्या 8 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षांनी घेतलेल्या मेहनतीचा परिणाम दिसून येत आहे. प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते. प्रचारात कितीही आरोप झाले, तरी मतदार सुज्ञ आहेत. त्यांना माहीत आहे कोणाला मतदान करायचं आहे. जास्तीत जास्त मुंबईकरांनी पुढं येऊन मतदान करावं, हीच विनंती आहे. माझा विजय निश्चित आहे."

लोकशाही धोक्यात आहे, किशोरी पडेणेकरांचा हल्लाबोल : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "लोकशाहीला वाचवणारा, लोकशाहीची कदर करणारा आणि लोकशाहीला घेऊन चालणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मी आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. बऱ्याच वर्षानंतर या मतदान प्रक्रियेला आम्ही सामोरं जात आहोत. नाशिक शिक्षक मतदार संघात आपण पाहिलं की शिक्षकांना सुद्धा विकत घेतलं जात आहे. शिक्षक जे गुरु आहेत, त्यांना बाटवण्याचं काम आपण काल पाहिलं. पैसे देऊन मतं खरेदी करणं याचाच अर्थ लोकशाही धोक्यात आहे. ज्यानं कोणी पैसे घेतले असतील, अशा लोकांनी मनाला पटेल तेच मतदान करावं. या खोकेशाहीला बरोबर अद्दल घडवावी. त्याचबरोबर विजय आपलाच आहे," असंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. ईडी चौकशीला किशोरी पेडणेकर गैरहजर, मुदतवाढ देण्याची विनंती
  2. कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरण; ठाकरे गटाच्या दोन नेत्यांची ईडीकडून कसून चौकशी
  3. बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची ईडीनं केली ६ तास चौकशी

Last Updated : Jun 26, 2024, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.