ETV Bharat / state

पाईपलाईन वाहून गेल्यानं कराड शहरात 'पाणीबाणी'; कॉंग्रेस, भाजपाचे नेते पोहोचले थेट 'पंपिंग स्टेशनवर' - Water Scarcity In Karad

Water Scarcity In Karad : कराड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यानं, तीन दिवसांपासून कराडकरांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. या पाणी समस्येमुळं राजकीय नेत्यांनी थेट पंपिंग स्टेशन गाठलं आहे.

Karad Water Supply News
कराड शहरात पाणी टंचाई (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 10:51 PM IST

सातारा Water Scarcity In Karad : ऐन पावसाळ्यात कराडकरांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आलीय. कराड शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालीय. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर् पाणी समस्या दूर व्हावी, म्हणून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते डॉ. अतुल भोसलेंनी मंगळवारी थेट पंपिंग स्टेशनवर जाऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

प्रतिक्रिया देताना आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील (ETV BHARAT Reporter)

कराडकरांना तीन दिवस नाही पाणी : कराडलगतच्या वारूंजी गावच्या हद्दीत कोयना नदीपात्रातून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणण्यात आली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं कोयना नदीचा प्रवाह वाढला आणि पाईपलाईन वाहून गेली. त्यामुळं तीन दिवसांपासून कराडकरांना पाणी नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सोमवारीच नगरपालिका प्रशासनाकडं केली होती.

काँग्रेस, भाजपा नेत्यांची धाव : पाणी समस्या लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी जुन्या पंपिंग स्टेशनवर जाऊन अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करावा. टँकरची संख्या वाढवावी. पाणी पुरवठ्याचे वॉर्डनिहाय नियोजन करावे. जुनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी. काही महिन्यांसाठी नवीन पुलावरून पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करावा. कराडच्या शुक्रवार पेठेतील जुने वॉटर हाउस पुन्हा सुरू करावे, असे पर्याय आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवले.

काँग्रेस, भाजपाच्यावतीनं टँकरने पाणीपुरवठा : विधानसभा आणि नगरपालिका निवडणूक तोंडावर असल्यानं कराडमध्ये उ‌द्भवलेल्या परिस्थितीत राजकीय पक्षांनी टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला. भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा रुग्णालयाच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून, तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी छोट्या छोट्या टँकरद्वारे प्रभागांमध्ये नागरीकांना पाणी पुरवठा करत नागरीकांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा -

  1. पाणीटंचाईची तीव्रता वाढली, राज्यातील दहा हजार गावे आणि वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा - Water Scarcity Increased
  2. दुष्काळात होरपळणारा मराठवाडा एकेकाळी 'सुजलम सुफलम', संशोधनात 'या' प्राण्याचे अवशेष आढळल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.