ETV Bharat / state

पोलिसांच्या सायरनचा आवाज, अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, नागरिकांची पळापळ; कराडमध्ये नेमकं काय घडलं? - Satara Police Security

Satara Police Security : बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या (शनिवारी) महाराष्ट्र बंद पुकारलाय. बंद काळात तणावाची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस दल सज्ज झालं आहे. वाचा कराडमध्ये नेमकं काय घडलं?....

karad police
कराड पोलीस मॉकड्रिल (Source : ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 10:05 AM IST

सातारा Satara Police Security : कराडमध्ये पोलिसांची अचानक कुमक दाखल झाली आणि भर चौकात अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यानं नागरिकांची मोठी पळापळ झाली. दंगा काबू पथक मेन रोडनं सरसावलं आणि कराडकरांच्या काळजात धस्सं झालं. नेमकं काय झालंय, हे क्षणभर नागरिकांना कळलंच नाही. सुसज्ज पोलिसांना पाहून नागरिक काळजीत पडले.

कराड शहरात दंगा काबू पथकाचं मॉकड्रिल : दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने कराड पोलिसांनी मॉकड्रिल केलं. दंगल नियंत्रणाच्या प्रात्यक्षिकामुळं कराड शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, कोणतीही अनुचित घटना घडली नसून पोलिसांनी दंगल नियंत्रणाचं प्रात्यक्षिक केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा : जिल्हा सुरक्षित राहावा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी जिल्हा पोलीस दल 24 तास अलर्ट मोडवर असतं. कोणतीही अनुचित घटना समोर आल्यास सर्वात प्रथम पोलीस कार्यवाही करतात. त्यामुळं अशा परिस्थितीत पोलिसांना सतर्क राहावं लागतं. याचाच आढावा घेण्यासाठी कराडमध्ये पोलिसांकडून मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. या माध्यमातून जिल्हा, तालुका परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदेबस्त : महाविकास आघाडीच्यावतीनं उद्या (शनिवारी) महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सातारा जिल्ह्यात चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आलीय. दंगा काबू पथक, सशस्त्र पोलीस, होमगार्डना बंदोबस्तावर तैनात करण्यात येणार आहेत. कराडमध्ये शुक्रवारी सायंकाळी डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत मॉकड्रिल आणि संचलन करण्यात आलं.

हेही वाचा - आगरकरांच्या जन्मगावात माणुसकीला काळिमा; अनाथ आश्रमाच्या नावावर सुरू होता वेश्या व्यवसाय, पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांना अटक - Raid On Prostitution Business

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.